अहमदपूर उपविभागात ३० हजार ग्राहकांकडे थकले ७ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST2021-02-17T04:25:14+5:302021-02-17T04:25:14+5:30
अहमदपूर उपविभागातील २१ हजार घरगुती वीज ग्राहकांकडे ४ कोटी ६१ लाख रुपये, १५४९ वाणिज्य ग्राहकांकडे ९९ ...

अहमदपूर उपविभागात ३० हजार ग्राहकांकडे थकले ७ कोटी
अहमदपूर उपविभागातील २१ हजार घरगुती वीज ग्राहकांकडे ४ कोटी ६१ लाख रुपये, १५४९ वाणिज्य ग्राहकांकडे ९९ लाख रुपये, २८५ औद्यागिक विज ग्राहकांकडे ९२ लाख ३५ हजार
रुपये थकबाकी असल्याचे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. सदर थकबाकीची रक्कम वसूल करण्याबाबत महावितरणच्या वरिष्ठ कार्यालयाने देयक थकीत असलेल्या ग्राहकांना संदेश
पाठवण्यास सांगितले आहे. ३१ जानेवारीपर्यंत देयकांचा भरणा करण्याची मुदत होती. ज्यांनी भरणा केला नसेल त्यांच्याकडून वसुलीसाठी १ फेब्रुवारीपासून विशेष मोहीम सुरू झाली आहे, अशी माहीती महावितरणचे उपविभागाच अभियंता प्रदिप काळे यांनी दिली आहे.
थकीत कृषी देयकांचा भरणा करण्यासाठी योजना
अहमदपूर उपविभात ८ हजार २०० शेतकऱ्यांकडे तब्बल ५९ कोटी रुपयांच्या कृषी
देयकाची थकबाकी आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्याने देयकाचा भरणा केल्यास व्याज आणि दंड पुर्णपणे माफ होणार आहे. तसेच जी वीज देयकाची रक्कम शिल्लक राहील, त्या रकमेचा एकाचवेळी भरणा केल्यास ५० टक्के रक्कम माफ होईल. म्हणजेच त्या शेतकऱ्याला ५० टक्के रक्कम भरणा करता येईल.
तसेच आता महावितरण ग्रामपंचायत तसेच गावातील सहकारी सोसायटीचे कार्यालय, बचत गट आदी ठिकाणी वीज भरणा केन्द्र सुरू करणार आहेत.
-तर तात्काळ वीज जोडणी...
थकीत विजबिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ विजजोडणी करून मिळेल.थकीत कृषी वीज देयकांचा भरणा करण्यासाठी महावितरणने राबवलेल्या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. कारण या योजनेमुळे मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. तसेच नविन कृषी वीज जोडणीसुध्दा आम्ही नियमानुसार तातडीने देणे सुरू केले आहे. १ एप्रिल २०२०पासून विजबिल न भरणाऱ्या विज ग्राहकांचा विद्यूत पुरवठा बंद करण्यात येईल. प्रदिप काळे, उपकार्यकारी अभियंता अहमदपूर.