६९ कोरोना रुग्ण दाखल;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST2021-03-08T04:20:04+5:302021-03-08T04:20:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी ६९ रुग्ण बाधित आढळले. तर प्रकृती ठणठणीत ...

69 corona patients admitted; | ६९ कोरोना रुग्ण दाखल;

६९ कोरोना रुग्ण दाखल;

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी ६९ रुग्ण बाधित आढळले. तर प्रकृती ठणठणीत झाल्याने ८० जणांना रुग्णालयातून सुटी मिळाली. आता बाधितांचा आलेख २५ हजार ८३४ वर पोहोचला असून, यांतील २४ हजार ४१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्य:स्थितीत ७१२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यांपैकी ४८१ होम आयसोलेशनमध्ये, तर २३१ रुग्ण कोविड केअरमध्ये उपचार घेत आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी ९५१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ४३, तर ५६२ जणांच्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये २६ असे एकूण ६९ नवे रुग्ण आढळले आहेत. रविवारी झालेल्या एकूण चाचण्यांतील पाॅझिटिव्हिटी रेट ४.५ टक्के असल्याचे डाॅ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.

निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

सध्या जिल्ह्यात ७१२ रुग्ण बाधित आहेत. यांतील ४८१ रुग्णांमध्ये अतिसौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. उर्वरित २३१ रुग्ण कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. यातील काही रुग्णांमध्ये अतिसौम्य लक्षणे आहेत.

रविवारी एकूण ८० रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ७ आणि होम आयसोलेशनमधील ७ अशा एकूण ८० जणांचा समावेश असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.४८ टक्के

२५ हजार ८३४ रुग्णांपैकी २४ हजार ४१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्याचे प्रमाण ९४.४८ टक्के आहे; तर आतापर्यंत ७१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.८ टक्के आहे.

रुग्ण दुपटीचा कालावधी ७०० दिवसांवर पोहोचला आहे, ही बाब दिलासादायक आहे. रिकव्हरी रेटही चांगला आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र गेल्या अनेक दिवसांपासून २.८ टक्के आहे. सदर प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग परिश्रम घेत आहे. शिवाय, वेळेत उपचार मिळण्यासाठी चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.

२ लाख ४२ हजार कोरोना चाचण्या

आतापर्यंत २ लाख ४२ हजार ५८ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात २५ हजार ८३८ रुग्ण पाॅझिटिव्ह आढळले. २ लाख ४२ हजार ५८ चाचण्यांचा पाॅझिटिव्हिटी रेट १०.७ टक्के आहे.

एप्रिल २०२० पासून जिल्ह्यात रुग्ण आढळले. मेमध्ये ११९, जून २१४, जुलै १८५१, ऑगस्ट ५९११, सप्टेंबर ९१८८, ऑक्टोबर ३०२२, नोव्हेंबर १५५५, डिसेंबर ११५०, जानेवारी ११९५, फेब्रुवारी ११७५ आणि चालू मार्च महिन्यात ४४२ रुग्ण आढळले आहेत. सर्वाधिक रुग्ण सप्टेंबर महिन्यात आढळले होते.

Web Title: 69 corona patients admitted;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.