६९ कोरोना रुग्ण दाखल; ८० जणांना मिळाली सुटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST2021-03-08T04:20:02+5:302021-03-08T04:20:02+5:30
लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी ६९ रुग्ण बाधित आढळले, तर प्रकृती ठणठणीत झाल्याने ८० जणांना ...

६९ कोरोना रुग्ण दाखल; ८० जणांना मिळाली सुटी
लातूर : कोरोनाचा संसर्ग सुरूच असून, रविवारी ६९ रुग्ण बाधित आढळले, तर प्रकृती ठणठणीत झाल्याने ८० जणांना रुग्णालयातून सुटी मिळाली. आता बाधितांचा आलेख २५ हजार ८३४ वर पोहोचला असून, यातील २४ हजार ४१३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर सद्य:स्थितीत ७१२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी ४८१ होम आयसोलेशनमध्ये, तर २३१ रुग्ण कोविड केअरमध्ये उपचार घेत आहेत.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी ९५१ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ४३, तर ५६२ जणांच्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये २६ असे एकूण ६९ नवे रुग्ण आढळले आहेत. रविवारी झालेल्या एकूण चाचण्यांतील पाॅझिटिव्हिटी रेट ४.५ टक्के असल्याचे डाॅ. एल. एस. देशमुख यांनी सांगितले.