किनगाव येथे तीन महिन्यात ६५ कुटुंब नियाेजन शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:25+5:302020-12-31T04:20:25+5:30

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दर शनिवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या ...

65 family planning surgeries in three months at Kingaon | किनगाव येथे तीन महिन्यात ६५ कुटुंब नियाेजन शस्त्रक्रिया

किनगाव येथे तीन महिन्यात ६५ कुटुंब नियाेजन शस्त्रक्रिया

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दर शनिवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्या जातात. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ३४ स्त्रियांनी कुटुंब नियाेजन शस्त्रक्रिया तर एक पुरुषाची नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गतवर्षी सन २०१८- २०१९ मध्ये वर्षभरामध्ये ९५ कुटुंब नियाेजन शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, लॉकडाऊन झाल्यानंतर ऑक्टोबर,नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात स्त्री - ६४ आणि पुरुष १ असे एकूण ६५ जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सांगवीकर, डॉ. किशोर कांदे, आरोग्य सहाय्यक नरहरी फड, रेखा भालेराव, एस.आर. शेकडे, पूजा शिरसाठ, विश्रांती गायकवाड, बालाजी घुले, राम यरमुळे, पुंडलिक भिंगेवाड, आशा ढाकणे, डी.एस. तीर्थंकर, एस.एस. मुळे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: 65 family planning surgeries in three months at Kingaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.