लिंबाळवाडीत दुसऱ्या दिवशी आढळले ६३ कोरोना बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:19 IST2021-04-11T04:19:36+5:302021-04-11T04:19:36+5:30

तालुक्यातील लिंबाळवाडी येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गावातील काही भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, गावातील एका व्यक्तीस ...

63 corona found in Limbalwadi the next day | लिंबाळवाडीत दुसऱ्या दिवशी आढळले ६३ कोरोना बाधित

लिंबाळवाडीत दुसऱ्या दिवशी आढळले ६३ कोरोना बाधित

तालुक्यातील लिंबाळवाडी येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गावातील काही भाविक सहभागी झाले होते. दरम्यान, गावातील एका व्यक्तीस कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चाचणीनंतर स्पष्ट झाले. दुसऱ्या दिवशी त्यांच्या संपर्कातील नऊ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या. दोन दिवसात गावातील २७५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात शुक्रवारपर्यंत ९७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आरोग्य विभागाचे एक पथक गावात नियुक्त करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास हसनाळे व त्यांच्या पथकाने शनिवारी लिंबाळवाडीतील २२५ जणांची तपासणी केली असता, त्यात ६३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत ५०० जणांची तपासणी करण्यात आली असून, कोरोना बाधितांची संख्या १६१ वर पोहोचली आहे. लिंबाळवाडीतील सर्वांची तपासणी करण्यासाठी एक वैद्यकीय पथक आहे. गावातील ६० वर्षांपुढील कोरोनाबाधित असलेल्या २२ जणांना चाकूर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येऊन तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे यांनी दिली.

दरम्यान, लिंबाळवाडी गावास तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, डॉ. श्रीनिवास हासनाळे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट आदी उपस्थित होते.

Web Title: 63 corona found in Limbalwadi the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.