दयानंद विद्यालयात ५५ टक्के उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:23 IST2021-02-05T06:23:48+5:302021-02-05T06:23:48+5:30

दयानंद वाणिज्यच्या विद्यार्थ्यांची निवड लातूर - येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व एनआयआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस मुलाखती ...

55% attendance in Dayanand Vidyalaya | दयानंद विद्यालयात ५५ टक्के उपस्थिती

दयानंद विद्यालयात ५५ टक्के उपस्थिती

दयानंद वाणिज्यच्या विद्यार्थ्यांची निवड

लातूर - येथील दयानंद वाणिज्य महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल व एनआयआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने कॅम्पस मुलाखती घेण्यात आल्या. महाविद्यालयातील १५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.या निवडीबद्दल संस्थाध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, प्राचार्य डॉ. श्रीराम सोळुंके, प्रा. शशिकांत स्वामी, कातपुरे, प्रा. दगडू शेख, डॉ. स्मिता भक्कड, डॉ. लहू शेंडगे, प्रा. कल्याणी पाटील, प्रा.क्यू.एन. शेख, प्रा. श्रावण बनसोडे, प्रा. सुधीर माने आदींनी कौतुक केले आहे.

नांदगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

लातूर - तालुक्यातील नांदगाव येथे दयानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उत्तम सुरवसे, दयाभाऊ सुरवसे, महादेव ढमाले, मनोज वाघमारे, माऊली ढमाले, प्रसाद देशपांडे, प्रवीण भोसले, ॲड. श्रीराम कुलकर्णी, नजिउल्ला शेख, दत्ता कळबंडे, अमित कळबंडे, योगराज शिंदे, सुनील काळे, कृष्णा वाघमारे, विजय शेकडे, विठ्ठल खाडप आदींची उपस्थिती होती.

जिजामाता संकुलात प्रजासत्ताक दिन

लातूर - औद्योगिक परिसरातील जिजामाता विद्यासंकुलात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. आ. विक्रम काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी डॉ.डी.एन. चिंते, प्राचार्या सलिमा सय्यद, राजकुमार शिंदे, मुख्याध्यापिका साविजेता खंदारे, प्रा. सुनील नावाडे, प्रा. बाबासाहेब सोनवणे आदींसह संकुलातील शिक्षक, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी ऑनलाइन प्रश्नमंजूषा तसेच रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

Web Title: 55% attendance in Dayanand Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.