जिल्ह्यात ५२८ कन्टेन्मेंट झोन; एका रुग्णामागे १७ जणांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:00+5:302021-04-10T04:19:00+5:30
५० व त्यापुढील वयाच्या रुग्णांच्या मृत्यूचे ८४ टक्के असून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण प्रति रुग्ण १७ आहे. रुग्ण दुप्पट होण्यास ...

जिल्ह्यात ५२८ कन्टेन्मेंट झोन; एका रुग्णामागे १७ जणांची तपासणी
५० व त्यापुढील वयाच्या रुग्णांच्या मृत्यूचे ८४ टक्के असून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण प्रति रुग्ण १७ आहे. रुग्ण दुप्पट होण्यास लागणारा कालावधी रुग्णालयानुसार ४२ दिवसांचा आहे.
५२८ कन्टेमेंट झोन
जिल्ह्यात एकूण ९१२३ कन्टेंमेंट झोन आहेत. त्यातील महानगरपालिका क्षेत्रात १९६१ आणि उर्वरित ७१६२ जिल्ह्यातील इतर भागांत आहेत. सध्या जिल्ह्यात ५२८ कन्टेंमेंट झोन ॲक्टिव्ह असून, ८५९५ झोन बंद झालेेले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख २७ हजार ८८५ तपासण्या करण्यात आल्या. त्यात ३८ हजार १६३ रुग्ण आढळले असून, पॉझिटिव्हिटीचा दर ११.६४ टक्के इतका असून, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग १७ टक्के आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी या पथकाला दिली.
मनुष्यबळाची मागणी
केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांकडे अधिकचे वैद्यकीय मनुष्यबळ, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पथकातील सदस्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मागण्यांबाबत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, मनपा आयुक्त अमन मित्तल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. गंगाधर परगे, अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आदींची उपस्थिती होती.