मास्क न लावणाऱ्या ५,२२५ जणांना ५ लाख २५ हजाराचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:18 IST2021-03-18T04:18:53+5:302021-03-18T04:18:53+5:30
मंगल कार्यालयांना नोटिसा... शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांना परवानगी आहे. यापेक्षा अधिक विवाह सोहळ्यांना उपस्थित ...

मास्क न लावणाऱ्या ५,२२५ जणांना ५ लाख २५ हजाराचा दंड
मंगल कार्यालयांना नोटिसा...
शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार ५० लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळ्यांना परवानगी आहे. यापेक्षा अधिक विवाह सोहळ्यांना उपस्थित राहिल्यास फौजदारी गुन्ह्यासह दंडात्मक कारवाई केली जाईल. अशा नोटिसा २१ मंगल कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. शिवाय लग्न तिथीच्या दिवशी महानगरपालिकेच्या पथकांकडून तपासणीही करण्यात येत आहे. त्यामुळे विवाह सोहळ्यातील उपस्थिती घटल्याचे चित्र आहे.
शहरात सर्वाधिक रुग्ण..
लातूर शहरात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत ११०० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात निम्मे रुग्ण लातूर शहरातील आहेत. त्यामुळे काेरोना प्रतिबंधक उपाययोजनेसाठी मनपा सतर्क झाली असून, शहरात नऊ ठिकाणी विनामास्क असणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेकडून १७ लाखांचा दंड वसून करण्यात आला आहे. फिजिकल डिस्टन्स आणि मास्क न लावणाऱ्या काही आस्थापनांवर गुन्हेही दाखल केले आहेत, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली.
वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे. वारंवार हात धुवून कोरोना रोखण्यासाठी सहकार्य करावे. सध्या रुग्णसंख्या वाढती आहे. संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे, गर्दीत जाणे टाळून उपरोक्त नियमांचे पालन करावे.
- मनपा कारवाई पथक