निलंग्यात दुकानाला आग लागून ५० हजारांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:18 IST2021-03-22T04:18:30+5:302021-03-22T04:18:30+5:30
निलंगा : येथील लातूर-बिदर रोडवरील एका दुकानाला रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. नगराध्यक्षांच्या तत्परतेमुळे तात्काळ ही ...

निलंग्यात दुकानाला आग लागून ५० हजारांचे नुकसान
निलंगा : येथील लातूर-बिदर रोडवरील एका दुकानाला रविवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास अचानकपणे आग लागली. नगराध्यक्षांच्या तत्परतेमुळे तात्काळ ही आग विझविण्यात आली. लातूर- बिदर रोडवर विद्यानगर येथील कॉम्प्लेक्समधील विकास आकडे यांचे नाना ऑटोमोबाइल्स या दुकानात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. सदरील घटना नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांना कळताच त्यांनी तात्काळ अग्निशामन दलाला पाचारण करून स्वतः मदत केली. त्यांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आली व मोठे नुकसान टळले. तर यात ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. यावेळी अग्निशमन दलाचे प्रमुख गंगाधर खरोडे, नागू तुरे, सतीश कांबळे, धनाजी सावळसुरे, संतोष बरमदे, आशिष अटल, शिवाजी पांचाळ, मोहन पांचाळ, अजित पांचाळ, श्रीकांत तोष्णीवाल यांनी आग विझविण्यास मदत केली.