२१६ जागांसाठी ५०० उमेदवारांनी ठोकले शड्डू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST2021-01-08T04:59:42+5:302021-01-08T04:59:42+5:30
तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी ६५५ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयाच्या परिसरात ...

२१६ जागांसाठी ५०० उमेदवारांनी ठोकले शड्डू
तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींसाठी ६५५ जणांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयाच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. तालुक्यातील नळेगाव, वडवळ (नागनाथ), शिवणखेड (बु.), अजनसोंडा (बु.), रोहिणा या मोठ्या ग्रामपंचायती आहेत. नळेगाव येथे सर्वाधिक चुरस राहणार आहे. तिथे १७ जागांसाठी तब्बल ७० उमेदवार दंड थोपटत निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
वडवळ (नागनाथ) येथे ३८, बावलगाव १४, उजळंब १८, कबनसांगावी १९, रोहिणा २६, नागेशवाडी १८, महाळंग्रा २७, बोरगाव २२, राचन्नावाडी २०, शेळगाव २२, अजनसोंडा (बु.) २६, महाळंगी २८, हाडोळी १५, कडमुळी १३, जगळपूर १२, लिंबाळवाडी १४ तर महाळंग्रावाडी येथे १२ उमेदवारी अर्ज राहिले आहेत.
दोन ग्रामपंचायती बिनविरोध...
केंद्रेवाडी ही सात सदस्यांची ग्रामपंचायत आहे. तिथे सावित्री केदार, राम केंद्रे, शशिकांत केंद्रे, वसुदेव केंद्रे, अज्ञानबाई केदार, बारकाबाई केदार, निर्मलाबाई केंद्रे यांचे अर्ज शिल्लक राहिल्याने ही ग्रामपंचायत बिनविरोध आली.