उदगीरातील स्ट्रीट लाईटसाठी ५० लाखांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:20 IST2021-03-31T04:20:06+5:302021-03-31T04:20:06+5:30

उदगीर शहराचा विकास झपाट्याने होत असून, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली विकासकामे होत आहेत. उदगीरच्या शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार ...

50 lakh fund for street lights in Udgira | उदगीरातील स्ट्रीट लाईटसाठी ५० लाखांचा निधी

उदगीरातील स्ट्रीट लाईटसाठी ५० लाखांचा निधी

उदगीर शहराचा विकास झपाट्याने होत असून, अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली विकासकामे होत आहेत. उदगीरच्या शहराच्या सौंदर्यात आणखी भर पडणार असून, शासनाने उदगीर शहरातील हेरिटेज पोल स्ट्रीट लाईटसाठी जवळपास ५० लाखाच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असल्याची माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तरीय) योजनेतंर्गत या कामात शासन निकषानुसार २५ टक्के स्वनिधी नगरपरिषदेला करावायाचा आहे. या योजनेअंतर्गत उदगीर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी हेरिटेज पोल आणि स्ट्रीट लाईट बसविण्यात येणार आहे. उदगीर शहरामध्ये अनेक नवीन विकास कामे सुरू होत आहेत, नवीन तहसील कार्यालय, प्रशासकीय इमारत अशा विविध विकासकामामुळे शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.

या नव्याने होणारे हेरिटेजपोल आणि स्टीट लाईटमुळे शहराच्या सौदर्यात भर पडणार आहे, असेही राज्यमंत्री बनसोडे म्हणाले.

Web Title: 50 lakh fund for street lights in Udgira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.