जिल्ह्यात ४९५ चाचण्यांमध्ये ५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST2020-12-04T04:57:55+5:302020-12-04T04:57:55+5:30
५९ जणांची कोरोनावर मात... बुधवारी जिल्ह्यात बाधित ५० आढळले, तर बरे होऊन ५९ जण घरी परतले आहेत. यात होम ...

जिल्ह्यात ४९५ चाचण्यांमध्ये ५० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
५९ जणांची कोरोनावर मात...
बुधवारी जिल्ह्यात बाधित ५० आढळले, तर बरे होऊन ५९ जण घरी परतले आहेत. यात होम आयसोलेशनमधील ४८ जणांचा समावेश असून, उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील तिघांना बरे झाल्याने सुटी मिळाली आहे. अन्य आठ जण विविध खासगी रुग्णालयांत उपचार घेत होते. त्यांचीही प्रकृती ठणठणीत झाल्याने सुटी देण्यात आली आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी ६०४ दिवसांवर...
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्ह्यात ९५.३८ टक्के असून, कोरोना रुग्ण दुप्पट दिवसांचा कालावधीही ६०४ दिवसांवर गेला आहे, ही बाब जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासादायक आहे. तर मृत्युचे प्रमाण २.९ टक्के आहे. सदर प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून केला जात आहे.