उदगिरात नव्याने ४२ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:15 IST2021-05-03T04:15:07+5:302021-05-03T04:15:07+5:30
येथील कोविड रुग्णालयात रविवारी आरटीपीसीआर तपासणीत २४, तर अँटिजन तपासणीमध्ये १८ कोरोना बाधित आढळले आहेत. इतर ठिकणाहून ११ रुग्णांना ...

उदगिरात नव्याने ४२ कोरोना बाधित
येथील कोविड रुग्णालयात रविवारी आरटीपीसीआर तपासणीत २४, तर अँटिजन तपासणीमध्ये १८ कोरोना बाधित आढळले आहेत. इतर ठिकणाहून ११ रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. २२ रुग्णांवर यशस्वी उपचार करून घरी सोडण्यात आले. कोरोनाबाधित १० रुग्णांचा, तर नॉन कोविड चार रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सध्या येथील कोविड रुग्णालयात ८७, होम आयसोलेशनमध्ये ९०, तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटर येथे ३८, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर संस्थेत १९, पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे १५, तोंडार पाटी येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ४०, जयहिंद मुलांचे वसतिगृह येथे १० आणि विविध खाजगी रुग्णालयांत १९३ अशा एकूण ४९४ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.