शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या ४० वर्षीय तरुणाचा गळा चिरून खून, पोलिसांनी घेतले संशयितांना ताब्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: March 31, 2025 06:02 IST

Latur Crime News: एका ४० वर्षीय तरुणाचा कोयत्यासह धारदार शस्त्राने वार करुन, गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना करकट्टा (ता. लातूर) गावात रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात पाच जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- राजकुमार जाेंधळे मुरुड (जि. लातूर) - एका ४० वर्षीय तरुणाचा कोयत्यासह धारदार शस्त्राने वार करुन, गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना करकट्टा (ता. लातूर) गावात रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मुरुड पाेलिस ठाण्यात पाच जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, वैशाली शरद इंगळे (वय ४०) यांनी मुरुड पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, आरोपी क्र. १ ते ५ यांनी संगनमत करून व कट रचून महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून मनात राग धरून पती शरद प्रल्हाद इंगळे याचा रविवारी करकट्टा येथील खडी केंद्रावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने हल्ला करून खून करण्यात आला. आरोपींनी यावेळी अर्धवट अवस्थेत मयताचा गळा चिरल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. करकट्टा येथील मुकादम म्हणून काम करणारा शरद प्रल्हाद इंगळे हे गावालगत असलेल्या खडी केंद्रावर रविवारी कामाला गेले होते. दरम्यान, आरोपींनी खडी केंद्रावर जाऊन शरद इंगळे यांच्यावर कोयता आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. यामध्येच त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती मुरुड ठाण्याचे सपोनि. अशोक उजागरे यांनी दिली.

ते मारेकरी दुचाकीवरुन पसार हाेताना एकाने पाहिले तरुणाच्या डाेक्यावर, शरीरावर सपासप वार केल्यानंतर शरद प्रल्हाद इंगळे हा तरुण जाग्यावरच रक्ताच्या थाराेळ्यात काेसळला. मृत्यू झाल्याची खात्री झाल्याने मारेकरी दुचाकीवरुन पसार झाले. मारेकरी पसार हाेताना गावातील एका व्यक्तीने त्यांना पाहिले. ताे घटनास्थळी दाखल हाेत पाहिले असता, शरद इंगळे याचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती त्यांनी नातेवाईकांना फोनवरून दिली.

खुनानंतर ‘त्या’ मारेकऱ्यांचे कपडे रक्ताने माखली हाेती खुनानंतर मारेकऱ्यांचे कपडे हे रक्ताने माखले हाेते. त्याला संशय आल्याने ताे खडीकेंद्र येथे येवून पाहिला असता, गावातीलच तरुणाचा मृतदेह पडल्याचे प्रत्यक्षदर्शीला दिसून आले. त्याने ही माहिती नातेवाईकांना दिली.

मारेकऱ्यांच्या नातेवाईकांची चाैकशी संशयीत मारेकऱ्यांच्या नातेवाईकांची सध्याला चाैकशी सुरू आहे. खुनात नेमके कोण-कोण सहभागी होते, याचा तपास पोलिस करत आहेत. मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असे मुरुड पाेलिसांनी सांगितले.

पाच जणांविरोधात मुरुड पोलिसात गुन्हा दाखल मयताची पत्नी वैशाली इंगळे यांच्या फिर्यादीवरून या प्रकरणात रोहन उर्फ सोंट्या बाळासाहेब शिंदे, रोहित उर्फ दाद्या बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब भारत शिंदे, गणेश भारत शिंदे आणि अन्य एक महिला (सर्व रा. करकट्टा, ता.जि. लातूर) यांच्याविरोधात मुरुड पोलिस ठाण्यात गु.र.नं. १०१/२०२५ कलम १०३, ६१ (२), ३ (५) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

करकट्टा शिवारातील खेडी केंद्रानजीकची घटना करकट्टा शिवारातील एका खडी केंद्रानजीकच्या मैदानात खुनाची घटना घडली. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. फिर्यादीने हा खून अनैतिक संबंधाचा राग मनात ठेवून करण्यात आल्याचे जबाबात म्हटले आहे. याचा तपास पोउपनि. नागरगोजे करीत आहेत. घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर