कासारशिरसीत ३९० ज्येष्ठांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:19 IST2021-03-19T04:19:02+5:302021-03-19T04:19:02+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी ...

390 seniors vaccinated in Kasarashir | कासारशिरसीत ३९० ज्येष्ठांनी घेतली लस

कासारशिरसीत ३९० ज्येष्ठांनी घेतली लस

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या वतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, पोलीस, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत कासारशिरसी ग्रामीण रुग्णालयात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण करण्यात येत आहे. मदनसुरी व कासार बालकुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवार, बुधवार व शुक्रवारी लसीकरण करण्यात येत आहे. आत्तापर्यंत कासारशिरसी ग्रामीण रुग्णालयात १७५, मदनसुरी केंद्रात १४२ जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती अधीक्षक डॉ. संगीता वीर, डॉ. माकणे व डॉ. गिरी यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत येथील व्यापारी गोविंद देवसाळे, नागप्‍पा होळकुंदे, नागेंद्र लोखंडे, किशोर देवसाळे यांनी सपत्नीक, तर सेवानिवृत्त शिक्षक रघुनाथ सोनटक्के, ज्येष्ठ पत्रकार श्याम मुळजकर आदींनी लस घेतली. ही लस सुरक्षित असून, सर्वांनी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: 390 seniors vaccinated in Kasarashir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.