३७५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:04+5:302021-03-13T04:36:04+5:30
अहमदपूर तालुक्यातील शिंदगी (बु.) येथे १ कोटी ४५ लाख, टाकळगाव- कामखेडा- १ कोटी ४५ लाख, रोकडा सावरगाव- १ ...

३७५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार
अहमदपूर तालुक्यातील शिंदगी (बु.) येथे १ कोटी ४५ लाख, टाकळगाव- कामखेडा- १ कोटी ४५ लाख, रोकडा सावरगाव- १ कोटी ४३ लाख, हगदळ गुगदळ- १ कोटी ३८ लाख, कोपरा- १ कोटी ४२ लाख, गोताळा- ९४ लाख, तांबट सांगवी- १ कोटी २६ लाख, खरबवाडी- गादेवाडी- ९७ लाख, थोरलेवाडी- ९७ लाख, सलगरा- ९० लाख तर चाकूर तालुक्यातील वडवळसाठी १ कोटी ४५ लाख असा एकूण पंधरा गावांसाठी १५ कोटी ३ लाख ६९ हजार ७६९ रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. पुढील प्रक्रिया तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे.
तालुक्यातील अधिकाधिक शेती सिंचनाखाली यावी, पडीक जमिनीचा विकास व्हावा,सिंचनाच्या माध्यमातून विकेल ते पिकेल ही संकल्पना तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आणणार असून या जलसंधारणाच्या नवीन कामातून शेकडो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेकडो शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती होणार आहे. सिंचनासोबत परिसरातील जनावरांचा चारा व पाणीप्रश्न मिटणार आहे, असे आ. बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.