शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

१५ हजार शेतकऱ्यांना ३० कोटींचे अनुदान, ११ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 20:20 IST

लातूर जिल्ह्यातील डिसेंबरअखेर ११ हजार ८९३ शेतक-यांना कृषी विभागाच्या वतीने ३० कोटी रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान देण्यात आले आहे. यातून जवळपास १५ हजार हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

- राजकुमार जोंधळे  लातूर  - जिल्ह्यातील डिसेंबरअखेर ११ हजार ८९३ शेतक-यांना कृषी विभागाच्या वतीने ३० कोटी रुपयांचे ठिबक सिंचन अनुदान देण्यात आले आहे. यातून जवळपास १५ हजार हेक्टरवरील क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी २० जानेवारी अखेरपर्यंत ६ हजार ४४८ शेतक-यांनी आपले प्रस्ताव दाखल केले आहेत. शेतकºयांना अल्प पाण्यावर अधिक उत्पादन घेता यावे, यासाठी राज्य शासनाच्या वतीने देण्यात ठिबक सिंचन योजना राबविली जात आहे. या योजनेअंतर्गत २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील एकूण १५ हजार ३३४ लाभार्थी शेतकºयांना एकूण २८ कोटी ५२ लाख ७ हजार रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. या योजनेमध्ये राज्य शासनाच्या वतीने ८० टक्के रक्कम अनुदानाच्या स्वरुपात दिली जाते. उर्वरित २० टक्के रक्कम संबंधित लाभार्थी शेतकºयांना खर्च करावी लागती. दिवसेंदिवस अल्प पावसामुळे  खरीप आणि रबी हंगाम धोक्यात येत आहे. आहे त्या पाण्यावर पीक घेणे कठीण होत आहे. यासाठी अल्प पाण्यावर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन घेतल्यास शेतकºयांना फायदा होतो. राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ठिबक सिंचन योजनेला जिल्ह्यातील शेतकºयांतून प्रतिसाद मिळत आहे. २०१७-१८ या वर्षात जिल्ह्यातील एकूण १५ हजार ३४४ शेतक-यांनी या योजनेसाठी आपले प्रस्ताव दाखल केले होते. या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून अनुदानापोटी २८ कोटी ५२ लाख ७ हजारांचे वाटप केले.ठिबक योजनेला कृषी विभागाकडून प्रोत्साहनबदलते पर्यावरण आणि हवामानाबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये करणे अनिवार्य ठरले आहे. पारंपरिक शेतीला बाजूला सारत नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केल्यास ती अधिक फायदेशीर ठरु शकते. यासाठी ठिबक सिंचन योजनेला प्रोत्साहन दिले जात आहे.११ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन...जिल्ह्यातील १५ हजार ३४४ शेतकºयांनी सिंचनाचा प्रयोग सुरू केल्यानंतर ११ हजार ४५१ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. यामध्ये ३ हजार ४५१ क्षेत्र ठिबक तर ११ हजार ८९३ हेक्टर क्षेत्र तुषार सिंचनाखाली आले आहे.२०१८-१९ साठी प्रस्तावतालुका     लाभार्थी  अर्ज बादअहमदपूर    ६१६    ००औसा    १५९४    १७चाकूर    ९५२    २९देवणी    १७५    ००जळकोट    २८२    ५२लातूर    ५५३    ०६निलंगा    ११०९    ४५रेणापूर    २९४    ०२शिरूर अनंतपाळ    ४४८    १२उदगीर    ४२५    ०२एकूण    ६४४८    १६५(२० जानेवारीपर्यंतची आकडेवारी)   

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पlaturलातूर