२८०१ घरकुलांसाठी २८ कोटींचा निधी वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:01+5:302021-06-05T04:15:01+5:30

लातूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २,८०१ घरकुलांना लातूर मनपाने मंजुरी दिली असून, राज्य शासनाकडून या घरकुलांसाठी २८ कोटी १ ...

28 crore fund distributed for 2801 households | २८०१ घरकुलांसाठी २८ कोटींचा निधी वितरीत

२८०१ घरकुलांसाठी २८ कोटींचा निधी वितरीत

लातूर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २,८०१ घरकुलांना लातूर मनपाने मंजुरी दिली असून, राज्य शासनाकडून या घरकुलांसाठी २८ कोटी १ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली. ज्या नागरिकांकडे स्वत:ची जागा आहे, परंतु पक्के अथवा बांधलेले घर नाही, अशा व्यक्तींसाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने दिला जातो. यापैकी राज्य शासनाकडून प्रति लाभार्थी १ लाख रुपये व केंद्र शासनाकडून दीड लाखांचा निधी वितरीत केला जातो.

महानगरपालिकेने शहरातील पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव घेऊन कागदपत्रांची छाननी व पुढील प्रक्रिया करून अर्ज मंजुरीसाठी पाठविले होते. त्याला राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली असून, २८ कोटी १ लाखांचा निधीही मंजूर झाला आहे. पालकमंत्र्यांनी हा निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता, असेही महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी सांगितले.

Web Title: 28 crore fund distributed for 2801 households

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.