खरबवाडी येथे २५ वर्षांच्या वर्चस्वाला हादरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST2021-01-21T04:18:36+5:302021-01-21T04:18:36+5:30
सात सदस्य असलेल्या खरबवाडी ग्रामपंचायतीत गत पंचवीस वर्षांपासून सुधाकर जगताप यांची सत्ता होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत प्रवीण जगताप यांनी ...

खरबवाडी येथे २५ वर्षांच्या वर्चस्वाला हादरा
सात सदस्य असलेल्या खरबवाडी ग्रामपंचायतीत गत पंचवीस वर्षांपासून सुधाकर जगताप यांची सत्ता होती. मात्र, यंदाच्या निवडणुकीत प्रवीण जगताप यांनी त्यांना शह देत त्यांच्या विरोधात उमेदवार उभे करून निवडून आणले. सातपैकी दोन जागा अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी राखीव होत्या. मात्र, निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने या दोन जागा रिक्त राहिल्या. उर्वरित पाच जागांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली, तर तीन जागा बिनविरोध निघाल्या. हे तीनही उमेदवार प्रवीण जगताप यांच्या पॅनलचे मानले जातात. उरलेल्या दोन जागांसाठी मतदान झाले. त्यातही ग्रामस्थांनी प्रवीण जगताप यांच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे पंचवीस वर्षांपासून असलेली सुधाकर जगताप यांची सत्ता संपुष्टात आली. या यशाबद्दल ग्रामस्थांनी काैतुक केले आहे.
* विजयी (बिनविरोध) उमेदवार - मन्मथ केरबा करडखेले, यशोदा प्रकाश कदम, सुनीता प्रवीण जगताप, (निर्वाचित) - शांताबाई बाबूराव कलवले, संगीता उत्तम जगताप.