जिल्ह्यात रविवारी आढळले २४ नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:17 IST2021-01-04T04:17:54+5:302021-01-04T04:17:54+5:30

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी ८१३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह ...

24 new patients were found in the district on Sunday | जिल्ह्यात रविवारी आढळले २४ नवे रुग्ण

जिल्ह्यात रविवारी आढळले २४ नवे रुग्ण

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत रविवारी ८१३ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून ६९८ व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यात ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रयोगशाळेतील चाचणीत १५ आणि रॅपीड अँटीजेन टेस्टमध्ये ९ असे एकूण २४ नवे रुग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख यांनी दिली. दरम्यान, ३८ जणांना रविवारी बरे झाल्याने सुटी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २, सामान्य रुग्णालय उदगीर येथील १, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील ३, समाजकल्याण हॉस्टेल ७ अशा एकूण ३८ जणांची प्रकृती ठणठणीत झाल्याने सुटी देण्यात आली.

रुग्णसंख्या घटू लागली...

रविवारी २४ नवे रुग्ण आढळले, तर कोरोनामुक्त होऊन ३८ जण रुग्णालयातून बाहेर आले. आतापर्यंत २२ हजार ११५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. यातील ३८ जण रविवारी कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.८३ टक्के झाले आहे. तर रुग्ण दुप्पट दिवसांचा कालावधी ६९० दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण मात्र बऱ्याच दिवसांपासून २.९ टक्के एवढे आहे.

Web Title: 24 new patients were found in the district on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.