औसा बाजार समितीवर २२ जणांचे जम्बो प्रशासकीय मंडळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST2021-04-04T04:19:56+5:302021-04-04T04:19:56+5:30
प्रशासकीय मंडळाची नेमणूक करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतले गेले नाही म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख ...

औसा बाजार समितीवर २२ जणांचे जम्बो प्रशासकीय मंडळ
प्रशासकीय मंडळाची नेमणूक करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासात घेतले गेले नाही म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली आहे. समितीवर पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व होते, सभापती राष्ट्रवादीचा होता. यामुळे सभापतीपद हे राष्ट्रवादीकडेच द्यावे, अशी मागणी त्यांनी अजित पवार यांच्याकडे केली आहे. आपली यादी डावलली गेल्याचे त्यांनी सांगितले. एक महिन्यापूर्वी अफसर शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन सदस्यांची समितीवर निवड करावी, अशी शिफारस केली होती. यामध्ये राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दत्तात्रय कोळपे, वलिखाँ पठाण आणि संगमेश्वर उटगे यांची नावे होती. लातूर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेचे समृत जाधव यांनी ३० मार्च २०२१ रोजी एका आदेशान्वये या तिघांची औसा बाजार समितीवर अशासकीय प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या उपस्थितीत या तिघांनी नुकताच पदभार स्वीकारला असला तरी, सभापतीपदासाठी आपला संघर्ष सुरूच राहील, असेही शेख म्हणाले.
औसा बाजार समितीवर २२ जणांचे प्रशासकीय मंडळ कार्यरत झाले असून, आणखी तीन महिला सदस्यांची नेमणूक होणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यामधील शह-काटशहाच्या राजकारणामुळे ‘ब’ वर्गातील बाजार समितीवर जम्बो प्रशासकीय मंडळाची यादी वाढल्याचे यावरून समाेर आले आहे.