एकुरका गावात २२ जणांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST2021-04-07T04:20:37+5:302021-04-07T04:20:37+5:30
मंगळवारी रात्री आरोग्य प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पंचायत समिती प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी एकुरका गावात तळ ठोकून आहेत. बाधित ...

एकुरका गावात २२ जणांना बाधा
मंगळवारी रात्री आरोग्य प्रशासन, महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पंचायत समिती प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी एकुरका गावात तळ ठोकून आहेत. बाधित असलेल्या रुग्णाला जळकोट येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, उदगीर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. जगदीश सूर्यवंशी यांनी दिली. आरोग्य विभाागचे पथक एकुरका गावात दाखल झाले असून, संपर्कात आलेल्या लोकांचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे. उदगीरसह जिल्ह्यातील इतर ठिकाणांहून आलेल्या लोकांच्या संपर्कामुळे एकाच दिवशी या गावात २२ जणांना बाधा झाल्याचे आढळून आले. असे आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. जळकोट येथील तहसीलदार संदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी गावास तातडीने भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. बाधितांच्या घराचा परिसर सील करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू हाेते.