जिल्ह्यातील २१ हजार शेतक-यांनी केला ७ कोटींचा वीजबिल भरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:18+5:302021-03-07T04:18:18+5:30
लातूर परिमंडलात बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. व्यावसायिक, वाणिज्यिक आणि कृषिपंपधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महावितरणच्यावतीने ...

जिल्ह्यातील २१ हजार शेतक-यांनी केला ७ कोटींचा वीजबिल भरणा
लातूर परिमंडलात बीड, उस्मानाबाद, लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. व्यावसायिक, वाणिज्यिक आणि कृषिपंपधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने महावितरणच्यावतीने वसुली मोहीम राबविली जात आहे. कृषिपंप धारकांसाठी विविध सवलती दिल्या जात असल्याने अनेकांनी थकीत वीजबिल भरण्याला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार लातूर परिमंडलाच्यावतीने वीजबिल भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात येत असून, नवीन कृषीपंप जोडणी धोरणाअंर्तगत राज्यात ‘महाकृषी ऊर्जापर्व अभियान’ राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने जनजागृती केली जात आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांना व्याज आणि दंडाच्या रकमेत माफीची सोय असल्याने जिल्ह्यात २१ हजार ९०१ शेतकऱ्यांनी ७ कोटी ३० लाखांचा भरणा केला आहे. यातील ६१० शेतकरी थकबाकीतून मुक्त झाले आहेत. त्यानिमित्त मुख्य अभियंता रवींद्र कोलप यांच्याहस्ते परिमंडल कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक नितीश वाघमारे, शिवराज अंबेकर, अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता गणेश सामसे, बी. जी शेंडगे, पी. आर. पुनसे, राजाराम काळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जनार्दन कसपटे, उपकार्यकारी अभियंता शिवाजी रेड्डी, विकास कांबळे यांची उपस्थिती होती.
महाकृषी ऊर्जापर्वाबाबत मार्गदर्शन...
महावितरणच्यावतीने महाकृषी ऊर्जापर्वाबाबत जनजागृती केली जात आहे. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना वीज सुरक्षेबद्दल माहिती दिली जात आहे. त्यानुसार गुरुवारी देशीकेंद्र विद्यालयात ही मेाहीम राबविण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता दिलीप भोळे, कार्यकारी अभियंता गणेश सामसे आदींसह शिक्षक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.