दीड महिन्यात एसटीला २० कोटींचा तोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:08+5:302021-06-04T04:16:08+5:30
मास्क घातल्याशिवाय प्रवेश नाही पहिल्या लाटेनंतर एसटी सुरू झाल्या होत्या. त्यावेळी मास्क घातल्याशिवाय प्रवेश नाही, असे एसटीने जाहीर केले ...

दीड महिन्यात एसटीला २० कोटींचा तोटा
मास्क घातल्याशिवाय प्रवेश नाही
पहिल्या लाटेनंतर एसटी सुरू झाल्या होत्या. त्यावेळी मास्क घातल्याशिवाय प्रवेश नाही, असे एसटीने जाहीर केले होते. तसा संदेशही एसटीवर लिहिलेला आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या जिल्ह्याअंतर्गत बससेवेलाही मास्क घातल्याशिवाय बसमध्ये प्रवेश दिला जात नाही. सध्या जिल्ह्यात एकूण ६० बसेस धावत आहेत. मुरुड, लातूर, निटूर, राणी अंकुलगा, खरोळा, पानगाव, मुरुड आदी मार्गांवर या बसेस धावत आहेत.
उदगीर-अहमदपूर मार्गावर अधिक प्रवासी
उदगीर-अहमदपूर मार्गावर सर्वाधिक प्रवासी आहेत. तालुक्याच्या ठिकाणी आणि काही जिल्ह्याअंतर्गत गावांनाच बससेवा आहे. जिल्ह्याबाहेर मुभा नसल्याने एसटी धावत नव्हती. उद्यापासून सुरू होण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. त्यानुसार नियोजन होणार आहे.
दिवसाला ५० लाखांचा तोटा
गेल्या दीड महिन्यापासून दिवसाला ५० लाखांचा तोटा एसटीने सहन केला आहे. सध्या पाच ते सहा लाख रुपये दिवसाला मिळत आहेत. गेल्या दीड महिन्यामध्ये २० कोटींचा तोटा झाला आहे. डिझेल, एसटीची दुरुस्ती आणि कर्मचाऱ्यांच्या पगारी या संदर्भात महामंडळाला ओढाताण करावी लागत आहे.
१८ जिल्ह्यांत निर्बंध शिथिल झाल्याचे संकेत मिळत असल्याने चालक, वाहकांनी एसटी सुरू होत असल्याचा आनंद व्यक्त केला.