२ लाख शेतकऱ्यांनी भरले ८२ कोटींचे थकित वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:17 IST2021-04-26T04:17:11+5:302021-04-26T04:17:11+5:30
लातूर जिल्ह्यातील ५१ हजार कृषी पंपधारक लातूर जिल्ह्यातील ५१ हजार ५१३ कृषी पंपधारकांनी २६ कोटी ९९ लाख २९ हजार ...

२ लाख शेतकऱ्यांनी भरले ८२ कोटींचे थकित वीज बिल
लातूर जिल्ह्यातील ५१ हजार कृषी पंपधारक
लातूर जिल्ह्यातील ५१ हजार ५१३ कृषी पंपधारकांनी २६ कोटी ९९ लाख २९ हजार रुपयांचा भरणा केला आहे. त्यापाठोपाठ उस्मानाबाद ५५ हजार २८५ तर बीड जिल्ह्यातील १ लाख ४ हजार २२ कृषी पंपधारकांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांकडे वीजबिल थकित आहे, अशा शेतकऱ्यांनी महाकृषी ऊर्जा पर्व अभियानांतर्गत आपल्या थकित बिलाचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
स्वत:हून मीटर रिडींग पाठविण्याची सोय
घरगुतीसह इतर वीज ग्राहकांना स्वत:हून दरमहा मीटर रिडींग पाठविण्याची सुविधा महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे. त्यासाठी चार दिवसांची मुदत उपलब्ध आहे. संचारबंदीमुळे महावितरणला रिडींग घेणे शक्य न झाल्यास वीज ग्राहकांना मीटर रिडींग मोबाईल ॲप किंवा वेबसाईटवर पाठविता येईल. प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत मीटर रिडींगचे फोटो घेण्यात येणार आहेत. वीज ग्राहकांनी स्वत:हून मीटर रिडींग पाठवावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.