१ हजार ९९५ चाचण्या; ४८ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:36 IST2021-03-04T04:36:07+5:302021-03-04T04:36:07+5:30

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी ९९४ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १७ पॉझिटिव्ह आढळले असून, रॅपिड ...

1,995 tests; 48 Positive | १ हजार ९९५ चाचण्या; ४८ पॉझिटिव्ह

१ हजार ९९५ चाचण्या; ४८ पॉझिटिव्ह

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत बुधवारी ९९४ जणांची चाचणी करण्यात आली. त्यामध्ये १७ पॉझिटिव्ह आढळले असून, रॅपिड ॲन्टीजन टेस्ट १ हजार ११ जणांची करण्यात आली त्यात ३१ पाॅझिटिव्ह आढळले. प्रयोगशाळेतील चाचणीत १७ आणि रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ३१ अशा एकूण ४८ नव्या बाधित रुग्णांची भर पडली आहे. रॅपिड ॲन्टीजन चाचणीतील पॉझिटिव्हीटी रेट १.७ टक्के असून, प्रयोगशाळेतील चाचणीतील पॉझिटिव्हीटी रेट ३.७ टक्के आहे. आतापर्यंत २ लाख ३३ हजार २६२ चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात २५ हजार ४९३ रूग्ण आढळले आहे. याचा पाॅझिटिव्हीटी रेट १०.९ टक्के आहे.

गेल्या वर्षात एप्रिल महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात आढळले. मे महिन्यात ११९, जुन २१४, जुलै १८५१, ऑगस्ट ५९११, सप्टेंबर ९१८८, ऑक्टोबर ३०२२, नोव्हेंबर १५५५, डिसेंबर ११५०, जानेवारी ११९५, फेब्रुवारी ११७५ आणि चालू मार्च महिन्यात ९७ रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत ६२२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यात होमआयसोलेशनमधील ३४१जणांचा समावेश असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. एल.एस. देशमुख यांनी सांगितले.

४४ जण कोरोनामुक्त...

बुधवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ४४ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ६, सामान्य रुग्णालय उदगीर येथील २, एक हजार मुला-मुलींच्या वसतीगृहातील ४ आणि होमआयसोलेशनधमील ३० जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात रूग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९४.७७ टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी ७०० दिवसांवर पोहचला असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: 1,995 tests; 48 Positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.