लातूर : काेराेनाचा संसर्ग ओसरत असून, बुधवारी १ हजार ८३५ चाचण्यांमध्ये केवळ ३६ रुग्ण बाधित आढळले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २५६ रुग्ण उपचाराधिन आहेत तर आतापर्यंत ९० हजार २७६ रुग्ण आढळले असून, यातील ८७ हजार ६२५ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत २ हजार ३९५ जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयाेगशाळेत ६५६ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १५ जण बाधित आढळले असून, १ हजार १७९ रॅपिड ॲन्टिजन चाचणीमध्ये २१ जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत. दाेन्ही चाचण्या मिळून ३६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. सध्या उपचार घेत असलेल्या २५६ रुग्णांपैकी ४३ रुग्ण आयसीयूमध्ये, ६ रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर, ११ रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर, ६३ रुग्ण मध्यम परंतु ऑक्सिजनवर, ४३ रुग्ण मध्यम परंतु विना ऑक्सिजनवर आणि १३३ रुग्ण साैम्य लक्षणांचे आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. एल. एस. देशमुख यांनी दिली. बुधवारी घेतलेल्या रॅपिड चाचणीमधील पाॅझिटिव्हिटी रेट २.० टक्के आहे तर प्रयाेगशाळेतील चाचणीचा पाॅझिटिव्हिटी रेट १.८ टक्के आहे.
७३ रुग्णांची काेराेनावर मात...
प्रकृती ठणठणीत झाल्याने बुधवारी ७३ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील ५, सुपरस्पेशालिटी हाॅस्पिटल गांधी चाैक येथील ९, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील १७, मुलांची शासकीय निवासी शाळा, औसा येथील २, उपजिल्हा रुग्णालय, निलंगा येथील ३, काेविड केअर सेंटर, दापका येथील १, पुरणमल लाहाेटी शासकीय तंत्रिनिकेतनमधील १९ अशा एकूण ७३ जणांनी काेराेनावर मात केली आहे.
बरे हाेण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के...
आतापर्यंत ८७ हजार ६२५ रुग्ण बरे हाेऊन घरी परतले असून, रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ६१० दिवसांवर गेला असून, ही बाब दिलासादायक आहे. मात्र, मृत्यूंचे प्रमाण गेल्या अनेक दिवसांपासून २.६ टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आराेग्य विभागाकडून केला जात आहे.