पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले १,६०० डॉक्टर्स १५ दिवसांत सेवेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 12:49 AM2020-09-18T00:49:22+5:302020-09-18T00:49:45+5:30

देशमुख म्हणाले, डॉक्टर्स आणि कर्मचारी सुटी किंवा रजेशिवाय कोविड १९ उपचार करीत आहेत.

1,600 doctors who have completed postgraduate courses in 15 days of service | पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले १,६०० डॉक्टर्स १५ दिवसांत सेवेत

पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले १,६०० डॉक्टर्स १५ दिवसांत सेवेत

Next

लातूर : सहा महिन्यांपासून अविरत सेवा देणाऱ्या डॉक्टरांना पाठबळ देण्यासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेले १ हजार ६00 तज्ज्ञ डॉक्टर्स राज्यातील विविध शासकीय रुग्णालयांत १५ दिवसांत रुजू होतील, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
देशमुख म्हणाले, डॉक्टर्स आणि कर्मचारी सुटी किंवा रजेशिवाय कोविड १९ उपचार करीत आहेत. यंत्रणेवर ताण आहे़ त्यात काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न वैद्यकीय शिक्षण विभाग करीत असून पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा निकाल लागल्याबरोबर येणाºया १५ दिवसांत विविध विषयांतील तज्ज्ञ डॉक्टर्स गरजेनुसार बहुतांश जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होतील. आॅक्सिजन तुटवड्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्री देशमुख म्हणाले, पूर्वी ८० टक्के उद्योगाला तर २० टक्के वैद्यकीय क्षेत्राला पुरवठा होत होता़ ते सूत्र यापूर्वीच बदलले असून आता ८० टक्के पुरवठा आरोग्य क्षेत्राला होतो़ कोविडविरुद्ध लढा देताना आपण अनेक नव्या गोष्टी शिकलो.

२०२१ वर्षही सतर्कतेचे!
जागतिक स्तरावर लसीबाबत प्रयत्न सुरू आहेत़ संशोधनाच्या सर्व पातळ्या पूर्ण करणे व ती आपल्यापर्यंत उपलब्ध होणे हा वेळ लक्षात घेता येणाºया २०२१ मध्येही सतर्कता बाळगावी लागणार, हे गृहीत धरूनच नियमावलीचा अंमल आणि पालन सर्वांनी केले पाहिजे, असेही देशमुख म्हणाले़

Web Title: 1,600 doctors who have completed postgraduate courses in 15 days of service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.