शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील 142 प्रकल्पांत 16 टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 22:50 IST

मांजरा प्रकल्पात 3.4 टक्के तर जिल्ह्यातील 8 मध्यम प्रकल्पांत जेमतेम पाणीसाठा 

हणमंत गायकवाडलातूर - यंदाच्या पावसाळ्यात 455.3 मि़मी़ पाऊस झाला असला तरी प्रकल्पांतील पाणीसाठा तळालाच आहे़ दोन मोठ्या, आठ मध्यम आणि 132 लघु प्रकल्पांत केवळ 16 टक्के उपयुक्त पाणीसाठी आहे़ लातूर शहराला पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात तर केवळ 3.4 टक्केच पाणी आहे. त्यामुळे परतीच्या पावसाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

लातूर जिल्ह्यात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरी पाऊसमान 725 मिमी आहे. आतापर्यंत 455.3 मिमी पाऊस झाला असला तरी महसूल मंडळनिहाय सारखा पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रकल्पांत पाण्याचा संचय झालेला नाही़ मांजरा प्रकल्प क्षेत्रात तर केवळ 277 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे लातूर, अंबाजोगाई, धारूर, केज, कळंब या शहरांना पाणीपुरवठा करणाºया मांजरा प्रकल्पात 3.4 टक्के पाणी आहे़ परतीच्या पावसावरच आता आशा आहे़ लातूर जिल्ह्यातील तावरजा मध्यम प्रकल्पात उपयुक्त पाणीच नाही़ 3.504 दलघमीचा मृतसाठा आहे. रेणा प्रकल्पात 2.638 दलघमी उपयुक्त पाणी आहे़ व्हटी मध्यम प्रकल्पातही मृत म्हणजे 1.060 दलघमी पाणी आहे़ तिरू मध्यम प्रकल्पातही 0.050 दलघमी उपयुक्त पाणी संचित झाले आह़े़ देवर्जन प्रकल्पात मात्र बऱ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा असून, हा प्रकल्प 41.78 टक्के भरला आहे़ साकोळ प्रकल्पातही 60.44 टक्के तसेच घरणी मध्यम प्रकल्पात 95.18 टक्के आहे़ मसलगा प्रकल्पात 45.5 टक्के पाण्याचा संचय झाला आहे़ लघु आणि मध्यम असे एकूण 140 आणि 2 मोठ्या प्रकल्पांत 16.79 टक्के पाणीसाठा आहे़ परतीचा पाऊस नाही झाला तर या पाण्यावरच 24 लाख लोकसंख्येला आपली तहान भागवावी लागणार आहे. 

असे आहे पर्जन्यमानलातूर जिल्ह्यात आतापर्यंत 455.3 मिमी पाऊस झाला असून, लातूर तालुक्यात 4.2.1, औसा 361.2 अहमदपूर 516.9 निलंगा 473.7, उदगीर 435.8, चाकूर 552.2, रेणापूर 480.9, देवणी 432.9, शिरूर अनंतपाळ 514.1 आणि जळकोट तालुक्यात 477.7 मि़मी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस कमी असला तरी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील सर्व मध्यम प्रकल्प भरले होते. शिवाय मांजरा प्रकल्पातही 80 टक्क्यांपुढे पाणीसाठा होता़ यंदा मात्र 3.4 टक्के पाणी आहे़ 

10 दिवसाआड शहराला पाणीपुरवठा.पावसाने ताण दिल्यामुळे लातूर महानगरपालिकेने पाणीपुरवठा 8 ऐवजी 10 दिवसांआड सुरू केला आहे़ मांजरा प्रकल्प तसेच साई, नागझरीत पाणी नसल्यामुळे महानगपालिकेने आतापासुनच पाणी जपून वापरण्यासाठी ही खबरदारी घेतली आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर