ग्राहक संरक्षण परिषदेचे १५ सदस्य निवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST2021-02-09T04:21:47+5:302021-02-09T04:21:47+5:30
हरभरा पिकावर फवारणीबाबत मार्गदर्शन लातूर : यंदाच्या रबी हंगामात जवळपास २ लाख २७ हजार हेक्टरवर हरभ-याचा पेरा झाला आहे. ...

ग्राहक संरक्षण परिषदेचे १५ सदस्य निवृत्त
हरभरा पिकावर फवारणीबाबत मार्गदर्शन
लातूर : यंदाच्या रबी हंगामात जवळपास २ लाख २७ हजार हेक्टरवर हरभ-याचा पेरा झाला आहे. मुबलक प्रमाणात पाणी असल्याने शत-शिवारात हरभरा पिक बहरले आहे. मात्र, लातूर, औसा तालुक्यातील काही भागात हरभरा पिकावर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. त्याअनुषंगाने कृषि विभागाच्या वतीने शेतक-यांना फवारणीबाबत मार्गदर्शन केले जात आहे. तसेच प्रत्यक्ष शेतावर जाऊन पिकाची परिस्थिती जाणून घेतली जात आहे.
बाजार समितीमध्ये माता रमाई यांची जयंती
लातूर : येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये माता रमाई यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी केशव कांबळे, उपसभापती मनोज पाटील, बालाप्रसाद बिदादा, तुळशीराम गंभीरे, हणमंत जाकते, प्रल्हाद सुरवसे, सुरेश धानुरे, भास्कर शिंदे, चंद्रकांत पाटील, नागेश वाघमारे, हर्षवर्धन सवई, लखन साबळे, लिंबराज वाघमारे, बशीर शेख, ज्ञानेश्वर कोकाटे, नवनाथ आदमाने, नंदा सुर्यवंशी, शामलबाई कांबळे, मुक्ताराम गायकवाड, तुकाराम राजपंगे आदींची उपस्थिती होती.
विजेच्या लपंडावामुळे नागरीक त्रस्त
लातूर : तालुक्यातील हरंगुळ गाव आणि नवीन वसाहत परिसरात विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे स्थानिक रहीवाश्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सोमवारी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत विजगुल होती. यासोबतच दुपारच्या वेळी वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले. सुरळीत विजपुरवठ्यासाठी महावितरणकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, त्याकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष आहे. नागरीकांच्या तक्रारीचे तात्काळ निरसन करण्याची मागणी होत आहे.
निवडणुक खर्च सादर करण्यासाठी धावपळ
लातूर : जिल्ह्यातील ३८३ ग्रामपंचायतींचा निकाल लागून १५ दिवस झाले आहे. त्यामुळे निवडणुक खर्च सादर करण्यासाठी उमेदवारांची धावपळ होत असल्याचे चित्र आहे. निवडणुक झाल्यानंतर एक महिन्याच्या आत खर्च सादर करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवार आपला खर्च सादर करण्यासाठी लागणा-या बिलांच्या पावत्या जमा करत आहेत. तसेच यंदा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने खर्च सादर करता येणार आहे.
जिल्ह्यातील हमीभाव खरेदी केंद्रावर शुकशुकाट
लातूर : शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर शुकशुकाट असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. शासनाने सोयाबीनला ३ हजार ८७० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. त्या तुलनेत बाजार समिती आणि खाजगी आडत बाजारात सोयाबीनला ४ हजारांहून अधिकचा दर मिळत आहे. परिणामी, बाजार समितीमध्ये सोयाबीनीच आवक वाढत असल्याचे चित्र आहे. बाजार समितीमध्ये गहू, उडीद, तूर, ज्वारी, सोयाबीन आदी पिकांची आवक चांगल्या प्रमाणात होत असल्याचे सांगण्यात आले.
लातुरातील बाजारात भाजीपाल्याची आवक
लातूर : शहरातील भाजीपाला बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कांदा, बटाटे, मिरची, गोबी, पालक, मेथी, काेथींबीर, टमाटे, वांगे, गाजर आदींची आवक होत असून, दरही स्थिर आहेत. शहरातील दयांनद गेट परिसरातील रयतू बाजार, औसा रोड, गंजगोलाई आदी बाजारात भाजीपाला विक्रीसाठी आणला जात आहे. यंदा मुबलक प्रमाणात पाणी असल्याने भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे भाजीपाल विक्रेत्यांनी सांगितले.
पाच नंबर चौकात वाहतूकीची कोंडी
लातूर : एमआयडीसी परिसरातील पाच नंबर चौकात वाहतुकीची कोंडी होत आहे. या चौकातील सिग्नल बंद असल्याची नागरीकांची ओरड आहे. सायंकाळच्या वेळी अवजड वाहनांची रेलचेल असल्याने दुचाकीचालकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स उभ्या केल्या जात असल्याने वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याकडे लातूर शहर वाहतूक शाखेने लक्ष देण्याची मागण होत आहे.
लातूर जिल्ह्यात शेतरस्ते अभियान
लातूर : जिल्ह्यात शेतरस्ते तयार करण्यासाठी अभियान राबविले जाणार आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या कार्यशाळेत जिल्हाधिकारी पृथ्वीराज पी.बी. यांनी ही माहीती दिली. त्याअनुषंगाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रस्त्यासाठी ठराव सादर सादर करावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात अतिक्रमणमुक्त शेतरस्त्यांची कामे केली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यशाळेत कृषी सहसंचालक टी.एन. जगताप, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आर.एस. पाटील, पी.डी. हनभर यांची उपस्थिती होती.
शाहू महाविद्यालयात सीपीआर कार्यशाळा
लातूर : येथील राजर्षी शाहू महाविद्यालयातील एनसीसी विभागाद्वारे सीपीआर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्थेेतील उपअधिष्ठाता डॉ. शैलेन्द्रू चौहान, डॉ. व्यंकटेश जोशी, डॉ. किरण तोडकरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य डॉ. ए.जे. राजू, प्रा. एस.एन. शिंदे, डॉ. ओमप्रकाश शहापूरकर, डॉ. अर्चना टाक, प्रतिक्षा मोरे, अनुश्री गायकवाड, धीरज माळगे यांची उपस्थिती होती.
अभंग जागर कार्यक्रमास प्रतिसाद - फोटोसह
लातूर : मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेच्या वतीने जगद्गुरू संत शिरोमणी तुकोबाराय यांच्या जयंतीनिमित्त अभंग जागर कार्यक्रम पार पडला. यावेळी कवी योगीराज, मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष लिंबराज सूर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक विनायकराव कदम पाटील, परिषदेचे अध्यक्ष विवेक सौताडेकर, रंजना चव्हाण, ताई बोराडे, बाळासाहेब जाधव, पृथ्वीराज पवार, समाधान माने, डॉ. अभय कदम, गोविंद जाधव, नामदेव कोद्रे, राजेंद्र माळी, वृषाली पाटील, नयन राजमाने, शैलेजा कारंडे, रजनी गिरवलकर, रामचंद्र बैले, सदाफुले, विमल कदम, सुनंदा शिंदे, ब्रिजलाल कदम, प्रा. द.मा. माने, बाळासाहेब यादव, युवराज ढविले आदींची उपस्थिती होती.