३६ केंद्रावर १४५८४ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:26+5:302021-09-13T04:19:26+5:30

लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा रविवारी लातूर शहरातील ३६ केंद्रांवर सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी १४ ...

14584 students appeared for the exam at 36 centers | ३६ केंद्रावर १४५८४ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा

३६ केंद्रावर १४५८४ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा

लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा रविवारी लातूर शहरातील ३६ केंद्रांवर सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी १४ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी १४ हजार ५८४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते तर २४८ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती.

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील नीट परीक्षा रविवारी दुपारी २ ते ५ या वेळेत शहरातील ३६ परीक्षा केंद्रांवर पार पडली. या परीक्षेसाठी १४ हजार ८३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २४८ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. दरम्यान, केंद्रावर सकाळी ११ ते १.३० वाजेपर्यंत प्रवेश देण्यात आले. त्यामुळे पालकांनी केंद्रावर गर्दी केली होती. सर्वच केंद्रांवर संबंधित केंद्र प्रशासन आणि पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना मास्क, सॅनिटायझर, हॅन्डग्लोज बंधनकारक करण्यात आले होते. कोविडच्या नियमांचे काटेकोर पालन करत नीटची परीक्षा सुरळीत पार पडली. सायंकाळी ५ वाजता परीक्षा संपल्यानंतर पालकांनी केंद्राच्या प्रवेशद्वारांवर गर्दी केली होती. परीक्षेच्या यशस्वितेसाठी समनव्यक जवाहर नवोदयचे प्राचार्य जी. रमेश राव, पोद्दार स्कूलचे प्राचार्य रेड्डी यांनी परिश्रम घेतले. ३६ केंद्रांवरील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन केले.

Web Title: 14584 students appeared for the exam at 36 centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.