समुपदेशनाने १३३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:42 IST2021-09-02T04:42:47+5:302021-09-02T04:42:47+5:30
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही प्रक्रिया अध्यक्ष राहुल केंद्रे, सीईओ अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या ...

समुपदेशनाने १३३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात ही प्रक्रिया अध्यक्ष राहुल केंद्रे, सीईओ अभिनव गोयल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रभू जाधव यांच्या नियंत्रणाखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्षा भारतबाई साळुंके, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, जि.प. सदस्य पृथ्वीराज शिवशिवे यांच्यासह संबंधित विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.
यावेळी पशुसंवर्धनमधील सहायक पशुधन विकास अधिकारी २, वृणोपचारकच्या ११, कृषी विभागातील विस्तार अधिकारी १, बांधकाममधील ११ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ अभियंतापदी पदोन्नती देण्यात आली. पंचायत विभागातील ५ ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी, आरोग्य विभागातील २ आरोग्य पर्यवेक्षक, १६ आरोग्य सहायक पुरुष, तर १३ महिला आरोग्य सहायकांना पदोन्नती देण्यात आली.
अर्थ विभागातील २ कर्मचाऱ्यांना सहायक लेखाधिकारी, एकास कनिष्ठ लेखाधिकारी, तर २ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक लेखा, ३ कर्मचाऱ्यांना वरिष्ठ सहायक लेखा म्हणून पदोन्नती देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागात सहायक प्रशासन अधिकारी म्हणून २, कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून ६, वरिष्ठ सहायक लेखा म्हणून १२, तर कनिष्ठ सहायक लेखा या पदावर २३ कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. शिक्षण विभागातील २१ शिक्षकांची मुख्याध्यापक या पदावर पदोन्नती करण्यात आली. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक प्रशासन अधिकारी व्ही. व्ही. मसलगे, रामकृष्ण फड, मनीषा चामे यांनी प्रयत्न केले.