शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पावणेतीन लाख शेतकऱ्यांनी भरला १३ कोटींचा पीकविमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 18:14 IST

रबी हंगाम : गतवर्षीच्या तुलनेत भरला दुप्पट पीकविमा

लातूर : प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत डिसेंबर अखेर रबी पिकासाठी २ लाख ७२ हजार २०१ शेतकऱ्यांनी १२ कोटी १५ लाख १६ हजार रुपयांचा पीकविमा जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये भरला आहे. पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचे हाल होत असताना बँकेने नियोजनबद्ध पद्धतीने पीकविमा जमा केल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पीकविमा जमा झाला आहे. 

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यात एकूण ११७ शाखा आहेत. पीकविमा भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत होती. त्यामुळे बँकेने नियोजनबद्ध पद्धतीने पीकविमा शेतकऱ्यांकडून संकलित केला. गतवर्षी २०१७ मध्ये १ लाख ४५ हजार ७०९ शेतकऱ्यांनी ६ कोटी ४३ लाख ८५ हजार रुपयांचा रबी पिकाचा पीकविमा भरणा केला होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने म्हणजे १ लाख २६ हजार ४९२ शेतकर्यांनी ६ कोटी ५१ लाख ३१ हजार रुपयांचा जादा पीकविम्याचा भरणा केला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे यांनी दिली. जिल्हा बँकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सुटीच्या दिवशीही शेतकऱ्यांचा पीकविमा भरुन पीकविम्याचे संकलन केले. राज्यात ३५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत. यात पीकविमा भरून घेण्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. पीकविमा भरून घेण्यातही बँकेने लातूर पॅटर्न निर्माण केला आहे.

तालुकानिहाय भरलेल्या शेतकऱ्यांचा पीकविमा... लातूर तालुक्यात ४१ हजार १२४ शेतकऱ्यांनी २ कोटी १ लाख ४२ हजार, औसा ४९ हजार १२६ शेतकऱ्यांनी २ कोटी ५० लाख ८६ हजार, चाकूर ३० हजार १२८ शेतकऱ्यांनी १ कोटी ४४ लाख ३३ हजार, रेणापूर २२ हजार ९७४ शेतकºयांनी १ कोटी १३ लाख ५२ हजार, अहमदपूर ३० हजार २९४ शेतकऱ्यांनी १ कोटी ५२ लाख २८ हजार, उदगीर १६ हजार १३५ शेतकऱ्यांनी ६९ लाख ४९ हजार, निलंगा ४८ हजार ३५५ शेतकऱ्यांनी २ कोटी २१ लाख ५९ हजार, जळकोट ६ हजार ८२१ शेतकऱ्यांनी २३ लाख ३५ हजार, देवणी १२ हजार ३३६ शेतकऱ्यांनी ५१ लाख ९४ हजार आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यातील १४ हजार ८९० शेतकऱ्यांनी ६६ लाख ३८ हजार रुपयांचा रबीचा पीकविमा भरला. जिल्ह्यात एकूण २ लाख ७२ हजार २०१ शेतकऱ्यांनी १२ कोटी ९५ लाख १६ हजार रुपयांचा पीकविमा भरला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा