रस्त्यावर फिरणारे १२ जण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:20 IST2021-04-20T04:20:46+5:302021-04-20T04:20:46+5:30
गांधी चौक पोलिसांनी १ ते १७ एप्रिलदरम्यान विनामास्क फिरणाऱ्या ७६९ जणांवर कारवाई करून ८१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल ...

रस्त्यावर फिरणारे १२ जण कोरोनाबाधित
गांधी चौक पोलिसांनी १ ते १७ एप्रिलदरम्यान विनामास्क फिरणाऱ्या ७६९ जणांवर कारवाई करून ८१ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. तर, मास्क न वापरणाऱ्या २४ आस्थापनांकडून ९२ हजार रुपये दंड घेतला. शिवाजीनगर पोलिसांनीही विनामास्क फिरणाऱ्या ३६१ जणांवर कारवाई करून ४९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. तर, ४९ आस्थापनांना ७९ हजार ४०० रुपयांचा दंड केला. विवेकानंद चौक पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या ३६२ जणांना ५२ हजार ५०० रुपये दंड ठोठावला. तर, २७ आस्थापनांवर कारवाई करीत २८ हजार रुपयांचा दंड केला. एमआयडीसी पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या १७२ जणांना २२ हजार ९०० रुपयांचा दंड केला, तर १८ आस्थापनांकडून ४६ हजार ५०० रुपयांचा दंड भरायला लावला. तसेच सर्व पोलीस ठाण्यांनी फिजिकल डिस्टन्स मेन्टेन न केल्याप्रकरणी ८६ जणांवर कारवाई करून ५२ हजार ३०० रुपये दंड केला. तसेच मोटार वाहन कायद्याप्रमाणे ५ हजार ६० जणांवर खटले दाखल करून १५ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड केला. तर, एकूण २३२ वाहने ताब्यात घेतली आहेत.
पोलीस कारवाईचे स्वागत...
रस्त्यावर अकारण फिरणाऱ्यांना पकडून त्यांची ॲण्टिजेन चाचणी केली जात आहे. पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे. दरम्यान, अंतर्गत रस्त्यांवर गटागटांनी थांबणाऱ्या तरुणांचीही ॲण्टिजेन चाचणी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.