शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लातुरात मोठी कारवाई, पोलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या १२ आराेपींना अटक!

By राजकुमार जोंधळे | Updated: December 9, 2022 19:19 IST

चाकूर, अहमदपूर ठाण्यांच्या हद्दीत मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन

लातूर : जिल्ह्यातील ३५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका हाेत असून, त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पाेलिसांनी चाकूर आणि अहमदपूर उपविभागात मध्यरात्री काेम्बिंग ऑपरेशन केले. दरम्यान, सलग दाेन दिवस करण्यात आलेल्या कारवाईत पाेलिसांना सतत गुंगारा देणाऱ्या बारा जणांना अटक करण्यात आली आहे. तर अवैध दारूविक्रीप्रकरणी पाच गुन्हे दाखल केले आहेत.

पाेलिसांनी सांगितले, निवडणूककाळात शांतता रहावी, यासाठी पाेलीस अधीक्षक साेमय मुंडे यांनी दिलेल्या आदेशानंतर ७ आणि ८ डिसेंबर राेजी रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत सहायक पाेलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने चाकूर आणि अहमदपूर पाेलिसांकडून दाेन्ही उपविभागात काेम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. अहमदपूर आणि चाकूर उपविभागात ५ अधिकारी आणि २७ अंमलदारांची स्वतंत्र पथके नियुक्त करण्यात आली हाेती.

लाॅज, हाॅटेलवर पाेलिसांचा छापा...पाेलीस पथकाने केलेल्या काेम्बिंग ऑपरेशनमध्ये अवैध शस्त्र जप्ती, अग्निशस्त्रे जप्ती, फरार आरोपी अटक करणे, लॉज आणि हॉटेलची तपासणी करणे, पॅरोलवर बाहेर असलेल्या मात्र, पॅराेलच्या आदेशाचा उल्लंघन करणाऱ्या आरोपींचा शोध घेणे, वाहन तपासणे, रेकाॅर्डवरील गुंड, गुन्हेगारांचा शोध घेणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई करणे आदी कारवाई करण्यात आली.

१३ अट्टल गुन्हेगारांची घेतली झडती...अहमदपूर आणि चाकूर उपविभागातील लाॅजेस, हाॅटेलची तपासणी करण्यात आली. न्यायालयाकडून काढण्यात आलेल्या, सतत पाेलिसांना चकवा देत फरार असलेल्या एकूण १२ आराेपींना वाॅरंट बजावत अटक करण्यात आली आहे. नाकाबंदी करुन संशयित वाटणाऱ्या वाहनांची तपासणी करणयात आली आहे. पाेलिस ठाण्यांच्या रेकाॅर्डवरील सराईत १३ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. शिवाय, अवैध दारूविक्री करणाऱ्यावर पाच स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर