बालसंगोपन योजनेत अनाथ मुलांचे ११६ प्रस्ताव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST2021-09-25T04:19:44+5:302021-09-25T04:19:44+5:30

मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टिस फॉर वेल्फेअर संघटनेने योजनेसाठी पात्र असलेले वंचित व गरजू बालकांचा शोध घेऊन जिल्ह्यातील ११६ ...

116 proposals for orphans approved in childcare scheme | बालसंगोपन योजनेत अनाथ मुलांचे ११६ प्रस्ताव मंजूर

बालसंगोपन योजनेत अनाथ मुलांचे ११६ प्रस्ताव मंजूर

मुव्हमेंट फॉर पीस ॲन्ड जस्टिस फॉर वेल्फेअर संघटनेने योजनेसाठी पात्र असलेले वंचित व गरजू बालकांचा शोध घेऊन जिल्ह्यातील ११६ प्रस्ताव प्रशासनास सादर केले होते. प्रस्तावांची प्रशासनाने पडताळणी करून ११६ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. या सहकार्याबद्दल एमपीजेद्वारा जिल्हा बालकल्याण समिती, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बालकल्याण समितीच्या अध्यक्षा उमा व्यास, सदस्या ॲड. सुजाता माने, ॲड. रजनी गिरवलकर, उमाकांत बिरादार, महिला व बालविकास अधिकारी वर्षा पवार, डी. ए. कारभारी, अरविंद थोरात, व्ही. एन. देवकर, डी. व्ही. कांबळे, एस. ए. कांबळे, अमर लव्हारे, चिनगुंडे परमेश्वर, भगत अजयकुमार, इंगळे सीमा, कोकाटे सुषमा, रोहिणी कुलकर्णी, गणेश यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एमपीजेचे रजाउल्लाह खान, साबेर काज़ी, जियाभाई खोरीवाले, ॲड. रब्बानी बागवान, कमरोद्दीन बार्शीकर, शेख सलीमउल्लाह, अब्दुल समद, सय्यद फारुक उपस्थित होते.

Web Title: 116 proposals for orphans approved in childcare scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.