रेणा मध्यम प्रकल्पात १०.७९ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:35+5:302021-04-06T04:18:35+5:30

रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथे सर्वात मोठा शेती आणि नळयोजना पाणीपुरवठा करणारा रेणा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता ...

10.79 per cent water storage in Rena medium project | रेणा मध्यम प्रकल्पात १०.७९ टक्के जलसाठा

रेणा मध्यम प्रकल्पात १०.७९ टक्के जलसाठा

रेणापूर तालुक्यातील भंडारवाडी येथे सर्वात मोठा शेती आणि नळयोजना पाणीपुरवठा करणारा रेणा मध्यम प्रकल्प आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता २१ दल घनमीटर असून, प्रकल्पात ३.३४८ घनमीटर पाणीसाठा आहे. त्यापैकी जिवंत उपयुक्त असा २.२१८ एवढा पाणीसाठा वापरण्यायोग्य आहे. या प्रकल्पात सध्या १०.७९ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पावरून रेणापूर शहर, पानगावसह १० खेडी, बिटरगावसह ५ खेडी आणि अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगावसह १७ खेडी अशा एकूण चार नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. रेणापूर तालुक्यात चांगला पाऊस झाला, मात्र धरण क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाल्याने रेणा मध्यम प्रकल्पात जेमतेमच पाणीसाठा झाला. रेणा मध्यम प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी व तालुक्यातील अर्ध्या गावांना पाण्यासाठी संजीवनी ठरलेला आहे. मात्र, गेल्या चार-पाच वर्षांमध्ये दोनदाच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला होता. यंदा या धरणामध्ये कमी जलसाठा झाल्याने सध्या १०.७९ टक्केच जलसाठा आहे. आणखीन, पावसाळा सुरू व्हायला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी बाकी आहे. सध्या तीव्र उन्हाळ्याला सुरुवात झाली असून, झपाट्याने पाण्याची पातळी कमी होत आहे. परिणामी, हा उपलब्ध असलेला जलसाठा जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घालवण्यासाठी संबंधित विभागाला व या योजनेवर अवलंबून असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या गावांना व त्यातील नागरिकांना पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करून तीन महिने हा पाणीसाठा कसा जाईल, याची काटकसर करून योग्य वापर करणे आवश्यक आहे.

२.२४८ उपयुक्त दलघमी साठा...

रेणा मध्यम प्रकल्पामध्ये उपयुक्त २.२४८ दल घनमीटर म्हणजेच १०.७९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सध्याच्या परिस्थितीत सदर मध्यम प्रकल्पावरील सर्व नळपाणीपुरवठा योजना सुरू आहेत, अशी माहिती रेणा मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी म्हणाले. भविष्यातील पाणीटंचाई राेखण्यासाठी उपाय-याेजना केल्या जात आहेत, असेही ते म्हणाले.

Web Title: 10.79 per cent water storage in Rena medium project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.