पालकमंत्री पाणंद रस्त्यांतर्गत १०० किमीचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:28+5:302021-06-04T04:16:28+5:30
जळकोट येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बाेलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा ...

पालकमंत्री पाणंद रस्त्यांतर्गत १०० किमीचे काम पूर्ण
जळकोट येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बाेलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, बाजार समितीचे माजी सभापती मन्मथप्पा किडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मारुती पांडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष संग्राम पाटील, युवक तालुकाध्यक्ष दळवे पाटील, नगरसेवक महेश धुळशेट्टे, गोविंद भ्रमण्णा, गजानन दळवे, पाशा शेख, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन, विठ्ठल चव्हाण, गोविंद माने, दिलीप कांबळे, संग्राम नामवाड, गोपाळकृष्ण गबाळे, ॲड. तात्या पाटील, श्रीकृष्ण पाटील, जि.प. सदस्य संतोष तिडके, बाबुराव जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढावे म्हणून तिरू नदीवर बॅरेजेसला मंजुरी मिळविण्यात आली आहे. जळकोटात प्रशासकीय इमारतीसाठी मंजुरी घेण्यात आली. १० कोटींच्या विश्रामगृहास मंजुरी घेण्यात आली. क्रीडा संकुलसाठी भरीव निधीची उपलब्धता देण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी म्हणून सार्वजनिक विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. बेघरांना पावसाळ्यापूर्वी घर मिळावे म्हणून ७३० घरकुलांना निधी उपलब्ध करून देण्यात आला. याशिवाय प्रत्येक गावात मूलभूत सुविधेचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. उदगीर- जळकोट विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचेही ते म्हणाले.