लातूर मल्टीस्टेटला १०० कोटीचा व्यवसाय, अत्याधुनिक सुविधामुळे बँको पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:43+5:302021-09-08T04:25:43+5:30

लातूर : येथील लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीला सलग सहाव्या वर्षी राज्यस्तरीय बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ५० ...

100 crore business to Latur Multistate, Bank Award for state-of-the-art facilities | लातूर मल्टीस्टेटला १०० कोटीचा व्यवसाय, अत्याधुनिक सुविधामुळे बँको पुरस्कार

लातूर मल्टीस्टेटला १०० कोटीचा व्यवसाय, अत्याधुनिक सुविधामुळे बँको पुरस्कार

लातूर : येथील लातूर मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटीला सलग सहाव्या वर्षी राज्यस्तरीय बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ५० ते १०० कोटींच्या ठेवी व अत्याधुनिक बँकिंग सुविधा दिल्याने ब्ल्यू बँको रिबन पुरस्कार २०२१ ने सन्मानित करण्यात आले आहे. राज्यातील सहकारी पतसंस्था (मल्टीस्टेट) आधुनिक तंत्रज्ञान वापरून ग्राहकांना देत असलेल्या सुविधा व ठेवी यावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पतसंस्थाचा गौरव कर्नाटकातील म्हैसूर येथे आयोजित बँको ॲडव्हॉन्टेज सहकार परिषदेत खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बँकेचे कार्यकारी संचालक इसरार सगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशैल कोरे, ठेव विभाग प्रमुख भागवत दाताळ, प्रशासकीय अधिकारी शाहेद शेख, स्वप्निल कोरे, महेबूब शेख, संतोष बोडके, माधव केंद्रे, शौकत शेख, उस्मानी अहमद रजा, अजीज पटेल आदींची उपस्थिती होती. लातूर मल्टीस्टेटने कमी कालावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन करून मोठी भरारी घेतली आहे. सलग सहाव्या वर्षी राज्य पुरस्कार मिळाल्याबद्दल मल्टीस्टेटचे चेअरमन जे.जी.सगरे यांच्यासह संचालक मंडळाचे कौतुक होत आहे. (वाणिज्य वार्ता)

Web Title: 100 crore business to Latur Multistate, Bank Award for state-of-the-art facilities