जिल्ह्यातील १ लाख २७ हजार निराधारांना मिळाला आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:19 IST2021-05-08T04:19:51+5:302021-05-08T04:19:51+5:30
श्रावणबाळ योजनेचे सर्वाधिक लाभार्थी... जिल्ह्यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे ९७ हजार ३७६ लाभार्थी आहेत, तर संजय गांधी ...

जिल्ह्यातील १ लाख २७ हजार निराधारांना मिळाला आधार
श्रावणबाळ योजनेचे सर्वाधिक लाभार्थी...
जिल्ह्यात श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे ९७ हजार ३७६ लाभार्थी आहेत, तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे ३० हजार २५६, इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना ८१ हजार ३३८, विधवा निवृत्ती वेतन योजना २ हजार हजार ४०७, तर राष्ट्रीय दिव्यांग निवृत्त वेतन योजनेचे ५०८ असे एकूण १ लाख २७ हजार ६३२ लाभार्थी आहेत. यामध्ये सर्वाधिक श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी आहेत.
संजय गांधी निराधार योजना - ३०,२५६
श्रावणबाळ योजना - ९७,३७६
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना - ८१,३३८
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना - २,४०७
इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना - ५०८
मदतीमुळे दिलासा...
या योजनेमुळे अनेकांना आधार मिळाला आहे. कोरोनाच्या संकटकाळात खात्यावर पैसे जमा होत असल्याचे समाधान आहे. घोषणा केल्याप्रमाणे मदत मिळाली आहे. - अण्णा महामुनी
मागीलवर्षी तहसीलकडे अर्ज देऊन योजनेसाठी अर्ज केला होता. योजना चांगली असून, दर महिन्याच्या महिन्याला पैसे खात्यावर टाकल्यास रुग्णालय, औषधाची सोय होईल - द्वारका कांबळे
या योजनेत केवळ १ हजार रुपयांची मदत केली जात आहे. ही मदत तोकडी आहे. शासनाने निराधारांना किमान ३ हजार रुपयांची मदत करावी, अशी मागणी आहे. वेळवेर पैसे जमा करावेत. - सखाराम शिंदे