डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार संशयित अमोल काळे याचा ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून त्याचा एसआयटी लवकरच ताबा घेणार आहे. ...
लवकरच पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)आणि टॉपच्या तीन गुप्तचर व तपास संस्थांमध्ये मोठे फेरबदल अपेक्षित आहेत. रॉ, आयबी आणि सीबीआय या संस्थांमध्ये प्रमुख पदाच्या व्यक्तींचा शोध सुरू आहे. ...
बिहारच्या राजधानीमध्ये महिला शिपायाचा मृत्यू झाल्यानंतर अधिकाऱ्याचे कार्यालय फोडणा-या आणि रस्त्यांवर उतरून दगडफेक तसेच पोलिसांचे वाहन उलथवून देणा-या १७५ पोलीस शिपायांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ...
पूर्णपणे देशी बनावटीच्या ‘आयएनएस अरिहंत’ या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रधारी आण्विक पाणबुडीने देशाच्या सागरी हद्दीत जरब बसविण्यासाठी पहिली गस्ती सफर यशस्वी केल्याने भारताची त्रिविध आण्विक संरक्षणसिद्धता सोमवारी जगजाहीर झाली. ...
पश्चिम बंगालमधील एका कालिमाता पूजेच्या एका मंडपामध्ये महिलांना गेल्या ३४ वर्षांपासून प्रवेश नाकारला जात आहे. या प्रथेचा समाजातील सुजाण लोकांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ...
दिल्ली सध्या प्रदूषणामुळे मृत्युच्या काठावर उभी आहे. फटाक्यांवर निर्बंध असूनही प्रदूषण कमी होताना दिसत नाही. डॉक्टरांनी सकाळ व सायंकाळी फिरायला न जाण्याचा सल्ला दिला आहे. ...
मुंबई-पुण्यात वातानुकूलित कक्षात बसून अवनीची पाठराखण करणे सोपे आहे. या पाठीराख्यांनी कोणत्याही गावात परिवारासह तीन दिवस मुक्काम करून पाहावा आणि शेतशिवारात जाऊन दाखवावे मग त्यांना वाघाची दहशत काय असते ते कळेल ...
यंदा दिवाळीवर दुष्काळाचे सावट आहे. याचा परिणाम दिवाळीच्या लक्ष्मीपूजनात महत्त्वाचे स्थान असलेल्या लक्ष्मी (झाडणी) बनविण्याच्या व्यवसायावर झाला आहे. ...