केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्यासह भाजपावर नाराजी व्यक्त करत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे प्रदेश सचिव व प्रवक्ते अशोक गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा देत युनायटेड रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ...
नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी सोमवारी पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर नक्षल्यांनी जमिनीत पेरून ठेवलेल्या दोन बॉम्बचा स्फोट घडवून आणला. नक्षलविरोधी अभियान राबविणारे पोलीस पथक पायी जात असताना मुख्य मार्गालगत हे दोन स्फोट झ ...
पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) १४ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या महाघोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसी याला देश सोडून जाऊ देऊ नका, अशी विनंती भारत सरकारने अँटिग्वा सरकारला केली आहे. तो सध्या अँटिग्वामध्ये असल्याची माहिती आहे. ...
नव्याने स्थापन केलेल्या ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’तर्फे (एनटीए) घेण्यात येणाऱ्या ‘नीट’ व ‘जेईई’सह अन्य देशपातळीवरील प्रवेश परीक्षा ‘आॅनलाइन’ नव्हे तर फक्त संगणकावर आधारित पद्धतीने घेण्यात येतील, असे स्पष्टीकरण केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेक ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या तयारीत असलेल्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना फोन करून विजयाच्या शुभेच्छा दिल्यात. ...
देशातील 12 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीवर बलात्कार प्रकरणात मृत्युदंडापर्यंतची शिक्षा असलेल्या आणि 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर अत्याचाराच्या प्रकरणात दोषींना कठोर शिक्षा देण्याची तरतूद असणाऱ्या विधेयकाला सोमवारी लोकसभेत मंजुरी देण्यात आली. ...
दोन वर्षांपूर्वी शहापूरातील भारत धापटे यांचे अपहरण करुन त्यांचा खून झाला होता. कोणताही धागादोरा नसतांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी यातील दोन आरोपींना अटक केली आहे. मुख्य सूत्रधार बाबू भगत शिवसेनेचा पदाधिकारी असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. ...