पतीशी भांडण, मतभेद नसूनही सासू-सासरे त्रास देतात एवढ्याच कारणावरून सासरचे घर सोडून वेगळे राहण्याचा व चरितार्थासाठी पतीकडून पोटगी मागण्याचा पत्नीला हक्क आहे, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
वैमानिकांच्या कमी संख्येमुळे इंडिगो विमान कंपनीला शुक्रवार, शनिवार व रविवार या तीन दिवसांत ७५ पेक्षा अधिक विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली, अशी चर्चा इंडिगोच्या कर्मचाऱ्यांत आहे. ...
सन २0३0 पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ग्रेटर नॉयडात आयोजित एका कार्यक्रमाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. ...
आम्ही सत्तेवर आल्यापासूनच्या गेल्या ५५ महिन्यांत स्वयंपाकाचा गॅस सुमारे आणखी ४० टक्के घरांपर्यंत पोहोचविल्यानंतर सरकार आता लवकरच सगळ्या घरांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध करून देईल, असे पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. ...
आतापर्यंत देशातील १७ कोटींपैकी ९ कोटी केबल टीव्ही आणि डीटूएच ग्राहकांनी आपल्या आवडीच्या वाहन्यांची निवड करून नवी पद्धत स्वीकारली आहे, असा दावा ट्रायने केला आहे. ...
विदर्भाच्या अर्थकारणाचा चेहरामोहरा बदलविणाऱ्या कृषिसमृद्धी महामार्गाला दुष्काळाची झळ बसली आहे. महामार्ग उभारण्यासाठी लागणारे आठ लाख घनमीटर पाणी आणायचे कोठून, असा सवाल रस्ते विकास महामंडळापुढे आहे. ...
हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करून दोन वर्षांमध्ये ठेवीदारांचे पैसे परत करून काही रक्कम शिल्लक राहील, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायालयात दिली. ...
लोकसभा निवडणुकीसाठी युती होणारच, असे भाजपाचे नेते छातीठोकपण सांगत असतानाच, शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढविण्यात आला आहे. ...
प्रख्यात गायक भूपेन हजारिका यांना जाहीर झालेला 'भारतरत्न' हा पुरस्कार स्वीकारण्यास त्यांच्या कुटुंबीयांनी नकार दिला आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध म्हणून भूपेन हजारिका यांच्या कुटुंबीयांनी 'भारतरत्न' पुरस्कारावर बहिष्कार घातला आहे. ...