मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्या. नरेश हरिश्चंद्र पाटील यांचीच नियमित मुख्य न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने शुक्रवारी केली. ...
नालासोपारा स्फोटके प्रकरणाचा अमोल काळे हा मुख्य सूत्रधार असून, त्याने मध्य प्रदेशातील सेंदवामधून शस्त्र, स्फोटके आणल्याची धक्कादायक माहिती राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी विशेष न्यायालयात देत वाढीव कोठडीची मागणी केली. ...
येथे सुरू असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत शुक्रवारी भारतीय खेळाडूंनी चक्क पाच सुवर्ण पदके जिंकली. बुद्धिबळात दोन तर बॅडमिंटनमध्ये एक तसेच मैदानी स्पर्धा प्रकारात दोन अशी पाच सुवर्णांची कमाई झाली. ...
केलियन एमबाप्पेने शानदार प्रयत्न करीत अखेरच्या क्षणी गोल नोंदविताच आईसलॅन्डविरुद्धच्या मैत्री सामन्यात विश्वविजेत्या फ्रान्सवरील पराभवाची नामुष्की टळली. हा सामना २-२ ने बरोबरीत राहिला. ...
नेमबाज मनू भाकरने शुक्रवारी रौप्य पटकावले. युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी मनू दुसरी भारतीय ठरली. तसेच भारतीय पुरुष हॉकी संघाने पोलंडला ४-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. मनूआधी तबाबी देवीने युवा आॅलिम्पिक स्पर्धेत दोन पदक जिंकण्याची कामगिरी ...
महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण तापत चालले असून, अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी न्यायाधीश व कायदेतज्ज्ञ यांची समिती नेमण्याची घोषणा केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी शुक्रवारी केली. ...
लोकलधील वाढत्या गर्दीमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने डबलडेकर लोकल सुरू करणे शक्य आहे का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी रेल्वे प्रशासनाकडे केली. ...
मुंबई-गोवा रेल्वे प्रवास अर्ध्या तासाने घटणार आहे. भारतीय रेल्वेचा अत्याधुनिक चेहरा अशी ओळख असलेल्या ‘तेजस’ एक्स्प्रेसची ताशी ११० किमी वेगाने चाचणी शुक्रवारी यशस्वीपणे पार पडली. ...
वाढीव वीजदरानुसार राज्यातील सर्व लघुदाब, उच्चदाब वीजग्राहक, उपसा सिंचन योजनांस सप्टेंबरची बिले आली आहेत. राज्यातील यंत्रमागांसह सर्व लघुदाब आणि उच्चदाब उद्योगांच्या बिलातील वाढ किमान १० टक्के ते कमाल २०-२५ टक्क्यापर्यंत आहे. ...
तनुश्री दत्ता प्रकरण चर्चेत असतानाच, एका भोजपुरी मॉडेलने एका निर्मात्यावर बलात्काराचा आरोप करीत वर्सोवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पेयातून नशेचे औषध देत चित्रपट निर्माता हैदर काझमी याने बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. ...