राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांत मंगळवारी रात्री बिगरमोसमी पाऊस, धुळीचे वादळ आणि विजा कोसळून ५० जण ठार, तर अनेक जण जखमी झाले, असे बुधवारी अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर ४८ तासांची प्रचार असल्याने त्यांचे भाचे आकाश आनंद यांना ‘बसप’ने केंद्रस्थानी आणून प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. ...
प्राप्तिकर खात्यामार्फत धाडी टाकून दडपण आणण्याचा भाजपने कितीही प्रयत्न केला तरी या पक्षाला लोकसभा निवडणुकीतील माझा विजय रोखता येणार नाही, असे द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्या कणिमोळी यांनी म्हटले आहे. ...
चित्रपट अभिनेत्यांना निवडणुकीत उतरवून त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ उठवण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांनी चालविला असला तरी, त्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर ठराव्यात. ...
बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपच्या सरकारवर आणि पालघरच्या पालकमंत्र्यांवर तसेच शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यावर टीकेची तोफ डागली. ...
विरार पूर्वेकडील सहकार नगर परिसरात राहणाऱ्या लता शिवाजी कोळंबकर (३०) या महिलेला लॉटरी लागल्याने बक्षीस म्हणून लॅपटॉप देतो असे सांगून लाखो रुपयांचा चूना लावल्याची घटना घडली आहे. ...