पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठविला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही पंतप्रधान मोदी यांनी शुभेच्छा पाठविल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि स्वागत केले. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा एक भाग म्हणून भाजपा राज्यातील आपल्या प्रत्येक मंत्र्याच्या कामगिरीचा उपयोग करून घेत आहे. एकेका मंत्र्याने त्यांचे रिपोर्ट कार्ड जनतेसमोर मांडण्याची रणनीती आखण्यात आली आहे. ...
कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावांमध्ये घरांची नोंदणी नुकतीच सुरू झाली आहे. ही नोंदणी गेल्या १४ महिन्यांपासून बंद असल्याने बांधकाम व्यावसायिक हैराण झाले होते. पण आचारसंहितेचे बिगुल वाजताच आठवडाभरापासून तेथे नोंदणी सुरू झाली आहे. ...
लोकसभा निवडणुकीसाठी लागू झालेली आचारसंहिता, जून महिन्यात येणारा पावसाळा आणि याच कालावधीत विधानसभा निवडणुकीसाठी लागू होणारी आचारसंहिता; अशा तीन प्रमुख घटकांमुळे महावितरणच्या पुनर्रचनेला आता डिसेंबर उजाडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...
येथील भोंडसी परिसरातील एका मुस्लीम कुटुंबावर सशस्त्र टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. जमावाने कुटुंबाला धर्मावरून शिवीगाळही केली, तसेच त्यांना पाकमध्ये जाण्यास सांगून धमकावले. ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्या चिन्हातून आता काँग्रेस हे नाव काढून टाकले असून, यापुढे पक्षाच्या लोगोमध्ये निवडणूक चिन्हे व त्याखाली तृणमूल एवढेच लिहिल्याचे दिसेल. ...