मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी नवी मुंबईतील १३. ३६ हेक्टर क्षेत्रावरील तब्बल ५४ हजार खारफुटींच्या झाडांची तोडणी करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली. ...
माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांवर जाऊ नका, मुख्यमंत्रीपदाबाबत माध्यमांशी तुम्ही बोलू नका, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजप-शिवसेना आमदारांच्या बैठकीत दिल्या. ...
काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड झाली तेव्हा सत्ताधारी बाकावर बसलेले माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी वडेट्टीवार यांची गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या आणि सभागृहाने या अनोख्या भेटीचे बाके वाजवून स्वागत केले. ...
मंत्रालयात वेटरच्या १३ जागांसाठी तब्बल ७ हजार अर्ज आले. त्यात पदवीधरच नव्हे तर पदयुत्तर उमेदवारही होते. यावरुन राज्यात किती बेकारी आहे, हे दिसून येते, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...
देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. ...
तेलगू देसमचे चार सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपला राज्यसभेत आताच कामचलाऊ बहुमत मिळाले आहे. मित्रपक्ष व मदतीला येणारे पक्ष यांच्या आधारे भाजपकडे आताच ११२ सदस्य झाले आहेत. ...
अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राणा यांनी अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे या चर्चेला उधाण आले आहे. ...