ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
कृषी क्षेत्राशी संबंधित रोजगाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा योजनेत समावेश करावा, रोजगार विषयासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिले. ...
गेली पंधरा वर्षे सरकारने राबविलेल्या चुकीच्या धोरणांचा परिणाम म्हणून गोव्यात आता पर्यटन धंदा संकटात आलेला आहे, अशी टीका गोवा लघू व मध्यम हॉटेल मालकांच्या संघटनेने सोमवारी येथे केली. ...
ओडिसाची राजधानी भुवनेश्वरमध्ये निदर्शने करणाऱ्या भाजपा महिला कार्यकर्त्या आक्रमक होऊन पोलिसांच्या अंगावर धावून गेल्या. या दरम्यान महिला आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. ...
अधिकाराचा गैरवापर करून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस कुलकर्णी (डीएसके) यांना नियमबाह्य कर्ज मंजूर केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या तीन बड्या अधिका-यांना अखेर या खटल्यातून सोमवारी वगळण्यात आले. ...