हरित कवच कमी झाल्यामुळे मुंबईचे तापमान वाढले आहे. कार्बन उत्सर्जन वाढले आहे. जागतिक तापमानवाढ, अनियोजित विकास आणि हरित कवचाचे प्रमाण कमी होणे यामुळेच सध्या मुंबईत अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...
सदर जागा घेण्याआधी एमएमआरडीएला इस्रो अर्थात भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि बीपीसीएल यांचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. हे दोन्ही अडसर दूर झाल्यानंतर पनवेलचे हे आर्थिक विकास केंद्र स्थापनेचा मार्ग सुकर होणार आहे. ...
ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ४०६ रुग्ण शनिवारी नव्याने आढळल्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख २१ हजार ५३८ झाली आहे. तर, ३४ जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात तीन हजार ४८९ मृतांची नोंद आतापर्यंत झाली आहे. ...
भातसा धरणाच्या उघडण्यात येणाऱ्या पाच दरवाजांपैकी १, ३ आणि ५ क्रमांकांचे दरवाजे अर्ध्या मीटरने, तर २ व ४ क्रमांकांचे दरवाजे पाव मीटरने उघडले आहेत. यामुळे भातसा धरणातून ९३८४ क्युसेक पाण्याचा प्रवाह विसर्ग करण्यात आला आहे. ...
या प्रकरणाशी जोडला गेलेला संदीपसिंह याने प्रदेश भाजप कार्यालयात तब्बल ५३ वेळा फोन केल्याची माहिती मिळत आहे. ती खरी असल्यास भाजप कार्यालयातील त्याचा ‘तो’ बॉस कोण आणि भाजपची संदीपसिंहशी एवढी जवळीक कशी, या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत ...
राज्यातील परिस्थिती पाहता शाळा सुरु होण्यावर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी अनिश्चितता व्यक्त केली आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये पहिली ते आठवीच्या शाळा सुरू होणार नाहीत. शिवाय नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार का, यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...
राज्यातील विविध विद्यापीठांच्या अधिकारी, कुलसचिव व समन्वयकांशी बोलून विद्यापीठांची परीक्षांसाठी काय तयारी आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला थोडक्यात आढावा : ...
अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांचं मराठी प्रेम, मराठी संस्कृतीवरील प्रेम कमी झालेले नाही. दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडं अशी संस्कृती ग्रामीण भाग वगळता अपवादानेच पाहायला मिळते. ...
कोरोनामुळे संपूर्ण हॉटेल व्यवसाय बंद पडला; शिवाय मुंबई, पुणे व अन्य शहरातून लोक गावाकडे परतल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. ...