ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
अमेरिकन डॉलरचे दर वाढून ते ७५.२८ रुपयांवर पोहोचल्याने ही भाववाढ होत तर आहे, सोबतच दलालांमार्फतही सुवर्णबाजारात अस्थिरता निर्माण केली जात असल्याने सतत भाव कमी जास्त होत असल्याचे सांगितले जात आहे. ...
अयोध्येत बुधवारी भूमी पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. राऊतांनी राम मंदिर आंदोलनात शिवसेनेच्या योगदानाचाही यावेळी पनरुच्चार केला. ...